India best placed to leverage te…

  Hyderabad: Prime Minis…

Hardik may campaign for MP polls

  Bhopal: Gujarat's Pati…

Journalist who wrote about Parri…

  Panaji: A journalist w…

NCP candidate among 4 killed in …

  Shillong: Four people,…

Clear sky in J&K cause sub-z…

  Jammu/Srinagar: A clea…

Partly cloudy sky on Monday

  New Delhi:It was a par…

Canadian PM visits Mathura wildl…

  Lucknow: Canadian Prim…

'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

उत्कर्ष महामार्गाच्या ‘वेबिनार’मध्ये जगभरातील कंत्राटदारांचासहभाग

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

– दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लड आदी सात देशांतील कंत्राटदारांचा सहभाग

– देशभरातील 18 राज्यातील कंत्राटदारही उपस्थित

 

मुंबई, दि. 5 : हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलच्या सुधारित तत्वानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘उत्कर्ष महामार्ग’ योजनेद्वारे राज्यातील दहा हजार किमी रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. या मॉडेलची माहिती देण्यासाठी राज्यात प्रथमच आयोजित ‘वेबिनार’मध्ये जगभरातील साडेचारशेहून अधिक रस्ते बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी या कंत्राटदारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘उत्कर्ष महामार्ग’ अंतर्गत राज्यातील 10 हजार किमीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलच्या सुधारित तत्वांना मान्यता देण्यात आली आहे. सुमारे 30 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पन्नास ते शंभर किमी रस्त्याचे एक प्रकल्प अशा सुमारे दीडशेहून अधिक प्रकल्पांची कामे होणार आहेत. या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या कंत्राटदारांनी सहभागी व्हावे व त्यांना या योजनेमध्ये कोणतीही शंका राहू नये, यासाठी आज मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘वेबिनार’चे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये राज्यासह जगभरातील विविध देशातील कंत्राटदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्स, वेबचॅट तसेच इमेलद्वारे सहभागी झाले होते. भारताबाहेरील दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लड आदी सात देश, भारतातील 18 राज्ये व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अशा सुमारे साडेचारशेहून अधिक कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता.

रस्त्यांचा दर्जा उत्तम रहावा, त्यांची देखभाल नियमित व्हावी, यासाठी हायब्रीड ॲन्युइटी मॉडेलअंतर्गत कामे करण्यात येत आहेत. यासाठी जगभरातील उत्तम व नामांकित कंत्राटदारांनी सहभागी व्हावे, यासाठी राज्यात प्रथमच वेबिनार ही संकल्पना राबविण्यात आली. पहिल्यांदाच राबविलेल्या या संकल्पनेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

या योजनेची व्याप्ती, वित्तीय सहकार्य, बँकेचे सहकार्य, प्रकल्प आराखडा, कामांचे वाटप, सुरक्षा अनामत, देयकांचा परताव्याची पद्धत अशा  विविध बाबींसह तांत्रिक गोष्टींसंबंधीच्या शंकांना यावेळी मंत्री श्री. पाटील व श्री. आशिषकुमार सिंह यांनी उत्तरे दिली. यावेळी सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) ए.ए. सगणे आदी यावेळी उपस्थित होते.

खड्डेमुक्त रस्त्यांच्या वॉररुमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खड्डेमुक्त रस्ते अभियानाच्या मंत्रालयातील वॉररुमला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी खड्डे बुजविण्याच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांच्या दालनात खड्डेमुक्त रस्ते अभियानासाठी वॉररुमची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे राज्यातील खड्डे बुजविण्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. या वॉररुमला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली.

यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले की, राज्यातील प्रमुख राज्य महामार्ग, राज्य मार्ग तसेच जिल्हा मार्गांवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रमुख राज्य महामार्ग व राज्य मार्गावरील 90 टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण होत आली आहेत. प्रत्येक खड्ड्यांची माहिती घेऊन ती गुगलद्वारे वेबसाईटवर टाकण्यात येते. त्यानंतर ते खड्डे बुजविल्यानंतरही त्याची छायाचित्रासह माहिती या साईटवर देण्यात येते. त्यामुळे रिअर टाईम कामांची माहिती एकत्रित वॉररुममध्ये जमा होत आहे.

प्रत्येक रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती मिळताच ती संबंधित अभियंत्याला सांगून ते बुजविण्यात येतात. तसेच या सर्व कामांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येत असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

खड्डेमुक्त रस्त्यांच्या कामावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त करून ऊर्वरित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच निर्देश दिले.

यावेळी विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) ए.ए. सगणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*