NCP to contest Gujarat polls sol…

  New Delhi: The Nationa…

Can Haryana's women achievers he…

  Chandigarh: Success as…

HC seeks Centre, West Bengal res…

  New Delhi: The Delhi H…

New Congress President to be ele…

  New Delhi: The Congres…

BJP announces third list of cand…

  Gandhinagar: The Bhara…

Centre should waive agricultural…

  New Delhi: Swaraj Indi…

CWC starts meet for Rahul's elev…

  New Delhi: The Congres…

Gujarat polls: Gohil, Modhwadia …

  Gandinagar: Senior Con…

Misty Monday morning in Delhi

  New Delhi: It was a mi…

BJP, government cheer Moody's ra…

  New Delhi: The ruling …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

कौशल्य विकासातून अधिक स्वयं रोजगार मिळवून देणार – शिक्षणमंत्री विनोद तावडे

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

skil

मुंबई, दि. 4 : कौशल्य विकासातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातून स्वयं रोजगार मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याच उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेच्या १० शाळांमध्ये कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरु केला असून याच धर्तीवर हा उपक्रम विविध शहरातील २०० शाळांमध्ये सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

लेंड अ हॅण्ड इंडिया या एनजीओच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय प्राथमिक शिक्षा परिषद यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेतील १० शाळांमध्ये कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कौशल्य विकासाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात व्हावा, या उद्देशाने लेंड अ हॅण्ड इंडिया या एनजीओने या उपक्रमांची थेट माहिती देण्याच्या दृष्टीने स्कील यात्रा –पुणे ते लडाख अशी बस सुरु केली आहे. पुणे ते लडाख या प्रवासादरम्यान स्कील यात्रा ही बस देशभर प्रवास करीत आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून इलेक्ट्रीक वायरींग, वेल्डींग, इंजिनीअरींग ड्रॉइंग, आरोग्य, कृषी, प्लंबींग, या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांने करावयाच्या कौशल्य अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली आहे. आज ही बस मंत्रालयाच्या आवारात आल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या बसचे स्वागत केले. कौशल्य विकासाचा उपक्रम महाराष्ट्रासह देशभरामध्ये पोहचविण्याचा उद्देश हा अतिशय सकारात्मक असून या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराची आणि स्वयं रोजगाराची संधी मिळणार आहे असे, श्री. तावडे यांनी सांगितले.

याप्रसंगी लेंड अ हॅण्ड इंडिया या संस्थेचे राज ‍गिल्डा, सहसचिव सुवर्णा खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*