Environment Ministry fined Rs 2 …

  New Delhi: The Supreme…

entre hikes MSP of wheat, pulses

  New Delhi: The central…

India for Afghan-controlled peac…

  New Delhi: India on Tu…

Rajasthan refers controversial B…

  Jaipur: Facing flak fr…

Modi to visit Mussourie

  Dehradun: Prime Minist…

ushma calls on visiting Afghan P…

  New Delhi: External Af…

Opposition to observe November 8…

  New Delhi: Opposition …

President to interact with scien…

  Bengaluru: On his maid…

Rahul Gandhi mocks at GST again

  New Delhi: A day after…

Meghalaya Election Department en…

  Shillong: The Meghalay…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

मानव विकास मिशनमध्ये रोजगार निर्मितीतून जीवनमान ऊंचावण्यावर भर द्यावा

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई दि. १३: मानव विकास मिशनमध्ये रोजगार निर्मितीतून जीवनमान ऊंचावण्यावर भर देण्यात यावा अशी सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहात मानव विकास कार्यक्रमाची राज्यस्तरीय बैठक अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र मानव विकास मिशनच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली.

बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव  अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र मानव विकास मिशनचे महासंचालक भास्कर मुंडे यांच्यासह गडचिरोली, परभणी,नांदेड, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अमरावतीचे अपर जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मानव विकास निर्देशांकामध्ये समाविष्ट असलेल्या १२५ तालुक्यांपैकी निवडक २५ तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी एक विशेष योजना राबविण्याचा मानस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात व्यक्त केला होता. या माध्यमातून हे तालुके रोजगारयुक्त तालुके करण्याचे धोरण निश्चित करतांना त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्याअनुषंगाने ही आज श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला ते म्हणाले की, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने नियोजन विभागात एक वॉररुम सुरू करण्यात येत आहे, या वॉररुमच्या कामाला गती देण्यात यावी तसेच या तालुक्यातील  विकास क्षमता लक्षात घेऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या क्षेत्रांची निवड करण्यात यावी, त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा शोध घेण्यात यावा.

प्रत्येक गावात पशुशेती झाली पाहिजे असे प्रतिपादन करतांना श्री. जानकर यांनी दूध, मांस तसेच मासे तसेच पशुधनाच्या माध्यमातून  उपलब्ध होणाऱ्या पदार्थांसाठी व्यापक बाजारपेठेचा शोध घेतला गेला पाहिजे असे सांगितले.रोजगार निर्मितीबरोबर कुपोषण निर्मूलनाकडे या मिशनमध्ये अधिक लक्ष दिले जावे, अशी सूचना वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशनकडून सादर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली. मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून ५ कि.मी अंतराच्या आत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप करण्याच्या योजनेअंतर्गत आयएसआय मार्क असलेल्या सायकलसाठी किंमत पूर्वी ३५०० रुपये इतकी मंजूर करण्यात आली होती. यामध्ये लाभार्थीचा  हिस्सा ५०० गृहित धरून ३ हजार रुपयांचे अनुदान मिशनमार्फत मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होते. आता या सायकलच्या दरात ४२०० रुपये इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आल्याने विद्यार्थिंनीना सायकल खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान  ३ हजार रुपयांहून ३५०० रुपये तर लाभार्थीचा हिस्सा ५०० रुपयांहून ७०० रुपये इतके करण्यास कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली .

तालुक्याच्या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत साहित्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठीच्या अनुदानात ही काल १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये इतकी वाढ करण्यास तसेच बाल भवनास भेट देण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रकमेत १० रुपयांवरून २५ रुपये इतकी वाढ करण्यास देखील मंजुरी देण्यात आली. याशिवाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ग्रीन बोर्ड बसवणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ड्युएल डेस्क पुरवणे यासारख्या योजनांही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मानव विकास मिशन अंतर्गत मोठ्या गावातील माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासिका सुरु करण्याची योजना राबविण्यात येते. याअंतर्गत मिशनअंतर्गत असलेल्या तालुक्यांमध्ये प्रति  तालुका २५ अभ्यासिका याप्रमाणे ३१२५ चे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आतापर्यंत २८८९ अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले आहे. ७६० अभ्यासिकांमध्ये युपीएससी, एमपीएससी या स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके पुरवण्यात आली आहेत.

मिशनमधील १२५ तालुक्यांसाठी ८६९ बसेसची खरेदी परिवहन विभागाच्या मान्यतेने एस.टी महामंडळामर्फत करण्यात आली असून या बसेस जिल्हास्तरीय समितीने निश्चित करून दिलेल्या मार्गावर सुरु आहेत. गाव ते शाळा दरम्यांना मुलींना मोफत प्रवासी सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. दररोज सरासरी ९३९८९ मुली या योजनेचा लाभ घेत आहेत.  राज्यात १२३ बालभवन विज्ञान केंद्र स्थापन झाली असून २०१६-१७ मध्ये २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या केंद्रास भेटी दिल्या आहेत. गरजु मुलींना सायकल योजनेचा लाभ या मिशनमधील तालुक्यातील १ लाख ३६ हजार ९२५ मुलींनी घेतला आहे तर एकूण मानव विकास निर्देशांकामध्ये २००१ च्या तुलने २०११ मध्ये सुधारणा झाली असल्याचेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*