We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

Vote for 'Gujarat model', reject…

  Ahmedabad: Bharatiya J…

RBI initiates PCA against Corpor…

  Mumbai: The Reserve Ba…

2nd phase of Gujarat polls: 10% …

  Gandhinagar: The first…

Modi saddened by actor Neeraj Vo…

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

समाजात सकारात्मकता पसरविण्यास ‘झी मराठी दिशा’ उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 5: माध्यमांचा मोठा पगडा समाजावर असतो. यासाठीच समाजात सकारात्मक विचार पसरविण्यास झी ने सुरू केलेल्या ‘झी मराठी दिशा’ साप्ताहिक उपयुक्तठरेल. तसेच या माध्यमातून खेळ, मनोरंजन, साहित्य आदी विषयांची माहिती वाचकांना उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी मराठी दिशा या साप्ताहिकाच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार तथा एस्सेलग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा, झी 24 तास व झी मराठी दिशा साप्ताहिकाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रारंभी अतिशय चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन माध्यमात जम बसविलेल्या सुभाष चंद्रा यांनी मुद्रित माध्यमात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. श्री. फडणवीस म्हणाले, श्री. चंद्रा हे एक अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून एक व्यक्ती आपल्या धाडसातून अचाट कर्तृत्व गाजवू शकतो हे दिसून येते. त्यांच्या अनेक प्रयोगांनी देशात एक नवीन प्रकारची दिशा तयार करण्याचे काम केले आहे. झी24 तास आणि या साप्ताहिकाचे मुख्य संपादक श्री. कुवळेकर यांनी नुकतेच झी 24 तास वर सुरू केलेला ‘सुखवार्ता’ हा कार्यक्रम समाजात होत असलेल्या सकारात्मक घटनांना न्याय देणारा आहे. श्री. फडणवीस म्हणाले, समाजात अनेक सर्वसामान्य माणसे आपल्या क्षेत्रात हिरो समान असतात. त्यांच्या कार्याला वाव मिळाला पाहिजे. यासाठी हे साप्ताहिक उपयुक्त राहील.

श्री. आठवले म्हणाले, या साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे काम होईल.

श्री. शिंदे म्हणाले, श्री. चंद्रा हे गीत, संगीत, नृत्त्य या क्षेत्रात नवीन पिढी निर्माण करण्याचे काम आपल्या वाहिन्यांतून करत आहेत. वैचारिक सकारात्मकता निर्माण करण्याचे काम त्यांच्या सप्ताहिकातून नक्कीच होईल.

महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असल्याचे सांगून सुभाष चंद्रा म्हणाले, आपण पाहिलेले एक स्वप्न 1992 साली झी वाहिनी सुरु करून सत्यात उतरवले. झी वाहिनी आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. समाजाला दिशा दिग्दर्शनाची गरज असून झी मराठी दिशा ती गरज पूर्ण करेल. आजचा युवा संदिग्ध अवस्थेत आहे त्याला दिशा देण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.

कुवळेकर प्रस्ताविकात म्हणाले, या साप्ताहिकाच्या माध्यमातून बातम्या, बातम्यांमागचे विश्लेषण केले जाईल. तसेच चांगल्या घटना, विधायक कथा, यशकथांना स्थान दिले जाईल. समाजातील सर्वच घटकांच्या आवडीचे वाचन या साप्ताहिकातून करता येईल.

यावेळी राज ठाकरे आणि श्री. महाडेश्वर यांचेही मनोगत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*