Madhya Pradesh legislators queue…

Bhopal: Legislators queue…

Non-BJP states boost centre's ag…

  New Delhi: It's a majo…

Voting for 14th President of Ind…

  New Delhi:  Voting to …

Next 'Mann Ki Baat' to air on Ju…

  New Delhi: Prime Minis…

1,141 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

Morphine mixture recovered from …

  New Delhi: Narcotics C…

Karnataka CM congratulates Presi…

  Bengaluru: Karnataka C…

Rainy Thursday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

Gaming PCs, convertibles to driv…

  New Delhi: The note ba…

1,877 pilgrims leave for Amarnat…

  Jammu: A fresh batch o…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

श्री साईबाबा संस्थानच्या अधिनियम-2004 मध्ये सुधारणा कार्यकारी अधिकारी आता मुख्य कार्यकारी अधिकारी

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

शिर्डी (जि. अहमदनगर) येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कार्यकारी अधिकारी या पदाचे नामाभिधान मुख्य कार्यकारी अधिकारी असे करण्यासह शताब्दी महोत्सवाच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापन समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वित्तीय अधिकारात वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या अधिनियम-2004 मध्ये सुधारणा करण्यास आणि त्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यासही मान्यता देण्यात आली.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) अधिनियम-2004 अन्वये शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे पूनर्गठन करण्यात आले असून संस्थान राज्य शासनाच्या थेट नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थान आणि संस्थानाद्वारे संचलित शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांच्या दैनंदिन कामकाजात या कायद्यातील तरतुदीनुसार प्रशासकीय समस्या उद्भवत होत्यात्यामुळे या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक होते. त्याबरोबरच श्री साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव येत्या ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कृती आराखडा तयार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी समितीच्या वित्तीय अधिकारात वाढ करणे आवश्यक होते.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कार्यकारी अधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करण्यात येतो. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या दर्जानुसार पदाचे नामाभिधान मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यास आणि त्यांना पाच लाख रूपयांपर्यंतच्या खर्चाचे विशेष वित्तीय अधिकार देण्याची सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आवश्यक गणपूर्ती नसल्यास बैठक तीस मिनिटांसाठी तहकूब करून त्यानंतर गणपूर्तीच्या अटीशिवाय बैठकीचे कामकाज करता येईल. तसेच श्री साईबाबा समाधी महाशताब्दी महोत्सावाच्या विकास आराखड्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 25 लाखापर्यंतच्या खर्चास तर एक कोटी रूपयांपर्यंतच्या खर्चास व्यवस्थापन समितीला अधिकार देण्यास मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच सल्लागार समितीमध्ये नवीन सदस्य नेमण्याची नियमावलीस्थावर व जंगम मालमत्ताअभिलेखपत्रव्यवहारआराखडे लेखे व दस्तऐवज या निरीक्षणासाठी सहसचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करणेसमितीचे ठराव शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी ठराव शासनाकड पाठविणेलेखापरीक्षकाचा अहवाल 30 सप्टेंबरपर्यंत सादर करणे आणि समिती विसर्जित केल्यास किंवा अधिक्रमण केल्यास प्रशासकपदी विभागीय आयुक्त दर्जाच्या व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याच्या सुधारणेस मंजुरी देण्यात आली. श्री साईबाबा शताब्दी सोहळ्याच्या कामास ताताडीने सुरूवात करण्यासाठी या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*