Woman breaches security cordon, …

  Kolkata: A woman bypas…

Allahabad HC refuses plea agains…

  Lucknow: In a big reli…

Reveal list of those whose NPAs …

  Thrissur (Kerala): The…

Mobile app e-saathi launched at …

  Lucknow: On the second…

PNB fraud: ED seizes luxury cars…

  New Delhi/Mumbai: The …

Opposition parties should field …

  New Delhi: Opposition …

'Canadian PM, politicians must n…

  Toronto: Reacting to P…

PNB fraud favouring Nirav Modi s…

  New Delhi: The practic…

Parrikar arrives in Goa, might t…

  Panaji: Goa Chief Mini…

Gunfight erupts in J&K

  Srinagar: A gunfight e…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

शासनवृत्तपत्रांच्यापाठीशीठामपणेउभे  – मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

बीड, दि. 1 :-  राज्यातील ब व क वर्ग वृत्तपत्रांच्या  समस्या सोडविण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून सर्व वृत्तपत्रांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथे आयोजित दैनिक झुंजार नेता वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सव सोहळयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार प्रितम मुंडे, आमदार विनायक मेटे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार भिमराव धोंडे, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमे  लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनमत घडविण्याचे काम करत असतात. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कमी होत असून प्रसारमाध्यमांसमोर विश्वासार्हता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. प्रसारमाध्यमांनी नकारात्मक व सकारात्मक बातम्यांचा समतोल  साधला पाहिजे अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यपुर्व काळात वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यासाठी महत्वाची भूमिका बजावली तर स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील वाईट प्रवृत्तीवर हल्ला करुन समाजाचे परिवर्तन करण्याचे काम केले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

दैनिक झुंजार नेताच्या कार्यालयाला भेट दिली असता तेथील वृत्तपत्रांचे जुने अंक पाहून या वृत्तपत्राने जनतेचा आवाज म्हणून केलेल्या कामाची पावती मिळते. या वृत्तपत्राने पुढेही असेच काम करण्याचे आवाहन करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दैनिक झुंजार नेता वृत्तपत्राच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड येथील सामान्य रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी गृहविभागाकडे असलेली जमीन उपलब्ध करुन दिल्याबदल त्यांचे आभार मानले. रुग्णालयाच्या विस्तारीकरणामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.

प्रारंभी दैनिक झुंजार नेता महोत्सव सोहळयाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करुन शुभारंभकरण्यात आला.त्यानंतर दैनिक झुंजार नेताच्या दिवाळी अंकाचे, महिला जगत पुरवणीचे, बालजगत पुरवणीचे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वर्षपूर्ती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दैनिक झुंजार नेताच्या लाईव्ह न्युज पोर्टलचे उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक अजित वरपे यांनी केले.  संचालक  विजय वरपे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास विविध स्तरातील मान्यवर, व  नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*