Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

Foggy Friday morning in Delhi, 1…

  New Delhi: It was a fo…

SC extends deadline for Aadhaar …

  New Delhi: The Supreme…

We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून समाज कल्याण योजनांचा आढावा

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

लातूर : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची लातूर विभागातील जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणी बाबतचा सविस्तर आढावा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक गतिमान पद्धतीने काम करून शेवटच्या घटकापर्यंतच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचण्याचे निर्देश दिले.

लातूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या लातूर विभागातील आढावा बैठकीत श्री.कांबळे बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, प्रादेशिक उपायुक्त लक्ष्मण वाघमारे, सहाय्यक आयुक्त बी. जी. अरवत यांच्यासह उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली चे सहाय्यक आयुक्त तसेच लातूर विभागातील मागासवर्गीय महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.

सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री.कांबळे म्हणाले की, लातूर विभागात कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वाढीव निधीचे प्रस्ताव तयार करून पाठवावेत तसेच घरकुल योजनेतंर्गत विभागातील सर्व जिल्ह्यातील मातंग समाजातील बेघर लोकांच्या याद्या तयार कराव्यात व घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्याची सुचना केली.

विभागातील सर्व समाज कल्याण कार्यालयांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी योजनांच्या अंमलबजावणीबाबत वाढीव निधी मागणीच्या प्रस्तावाबाबत चर्चा करावी, असे श्री.कांबळे यांनी सांगितले. यावेळी शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर, रमाई आवास योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, स्वाभिमान व सबलीकरण योजनांची जिल्हानिहाय माहिती घेऊन श्री.कांबळे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

प्रारंभी प्रादेशिक उपायुक्त श्री.वाघमारे यांनी प्रास्ताविक करून लातूर विभागातील सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तर सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*