'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी होणारसाजरा निवडणूक प्रक्रियेत विशेष सहभागाबद्दल दिव्यांगांचा सत्कार

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दि. 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.  यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी आयोगाने ठरवून दिलेल्या ‘सुलभ निवडणुका’ (ॲक्सेसीबल इलेक्शन्स) संकल्पनेनुसार निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेल्या दिव्यांग मतदारांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती मेहता यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी उपस्थित होत्या. श्रीमती मेहता यांनी पुढे माहिती दिली की, ‘राष्ट्रीय  मतदार दिन’ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर, विधानसभा मतदार संघ स्तर व मतदान केंद्रस्तर अशा सर्व स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा जिल्हास्तर मुख्य कार्यक्रम चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने यावर्षी ‘अक्सेसीबल इलेक्शन्स’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या विषयानुसार आयोगाकडून प्राप्त झालेल्या दिव्यांग व्यक्तींच्या यादीतून मुंबई शहर जिल्ह्यासाठी अख्तर नुरुद्दीन ढाले यांची ‘आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या सहकार्यातून 15 ते 21 वर्षे वयोगटातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), स्काऊट आणि गाईड, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), नेहरु युवा केंद्राच्या युवक- युवतींचाही सहभाग घेण्यात येणार आहे.

या दिवशी 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर प्रथमच मतदार नोंदणी झालेल्या मतदारांना प्रातिनिधिक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 1 जानेवारी 2000 रोजी जन्मलेल्या आणि प्रथमच मतदार म्हणून नोंदणी झालेल्या नवमतदारांचा ‘मिलेनियम व्होटर’ म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. ‘प्राऊड टू बी अ व्होटर- रेडी टू व्होट’, ‘मतदार असल्याचा अभिमान- मतदानासाठी सज्ज’ हे घोषवाक्य लिहिलेले बॅचेस वाटण्यात येणार आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी मतदानयंत्रे (इव्हीएम) ठेवण्यात येणार असून ती विद्यार्थ्यांना हाताळता येऊ शकतील.

राष्ट्रीय निवडणूक ज्ञान स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या दादर येथील बालमोहन विद्यामंदिरच्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येईल. मतदार जागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा, वकृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला आदी स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) स्तरावर निबंध, रांगोळी, पथनाट्य तसेच मतदार जागृतीसाठी  करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्याची 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झाली असून त्यानुसार जिल्ह्यात 24 लाख 53 हजार 102 मतदार आहेत. यामध्ये 13 लाख 46 हजार 904 पुरुष, 11 लाख 6 हजार 94 महिला आणि इतर 104 मतदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*