'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

राष्ट्रीय मतदार दिन ‘आजचा दिवस माझा’

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

होय ! युवा मित्रांनो आजचा दिवस हा तुमचाच आहे आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सर्वांनी असेच म्हणायला हवे. की आज राष्ट्रीय मतदार दिन आणि हा दिवस माझा आहे. भारतीय लोकशाही ही अधिक बळकट होण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावायलाच हवा आणि आपले कर्तव्य पूर्ण करावे.

भारत निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली. त्यानिमित्ताने पहिल्या वर्धापन दिनापासून म्हणजे 25 जानेवारी 2011 पासून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन  म्हणून देशभरात राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा लेख…

राष्ट्रीय मतदार दिनाचा यावर्षी मुख्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तर नंदूरबार येथे राज्यस्तरावर साजरा होत आहे. या शिवाय सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी, विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्र अधिकारी यांच्या स्तरावर देखील विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून हा दिवस साजरा केला जात आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील युवा मतदारांना लोकशाही प्रक्रियेसंदर्भात जागरुक करुन त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतात. तसेच लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ सर्व मतदारांना दिली जाते. ही शपथ पुढीलप्रमाणे आहे…हम भारत के नागरिक लोकतंत्र में अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते है कि हम अपने देश की लोकतांत्रिक परम्पराओं की मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र, निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखते हुए, निर्भीक होकर धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा एवं अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचनों में अपने मताधिकार का प्रयोग करेंगें। आपणही ही शपथ घेवून या मोहिमेत सहभागी व्हावे.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राज्यभरात सर्वत्र जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नवीन मतदारांना निवडणूक ओळखपत्र आणि बॅज देतील तर विशेष कक्ष स्थापन करुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर मतदारांसाठी मतदार यादीसंदर्भातील नमुना 6, 7,8 आणि 8 अ चे अर्ज उपलब्ध करुन दिले जातील. तसेच ज्या मतदान केंद्रांमध्ये जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित राहून अधिकाधिक मतदार नोंदणी करतील.

जनजागृती

एकूणच या संदर्भात जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन होत आहे. यात प्रामुख्याने युवा मतदारांसाठी  महाविद्यालयांमध्ये युवक महोत्सव तसेच विविध स्पर्धांचे आयोजन, विजेत्यांना पारितोषिके वाटप कार्यक्रम तसेच महिला, स्थलांतरित, आदिवासी, बेघर, तृतीयपंथी, दिव्यांग, निराधार व्यक्ती यांची जास्तीत जास्त प्रमाणात मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, विविध महाविद्यालयात युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, लोककलेच्या माध्यमातून जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे त्यांच्यासाठी मतदान जागृती बाबत प्रोत्साहीत करण्यावर भर दिला जाईल.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, युवकांनी लोकशाही विचारांचे प्रचारक-प्रसारक बनावे, लोकशाहीमध्ये केवळ हक्काला महत्त्व देऊन चालणार नाही. तर जबाबदारीला महत्त्व आहे. मतदान हा आपला हक्क तर आहेच पण ती आपली जबाबदारी देखील आहे. हे समजून घेवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे महत्वाचे आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून देशाचे कायदे, नियम, शिस्त यांचे पालन केले पाहिजे. लोकशाही प्रणालीत निवडणूक आणि मतदान ही संधी आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदान करून प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सकारात्मक योगदान दिले पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात लोकशाहीच्या फायद्याचा प्रकाश निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही सुदृढ आणि बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*