Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

Foggy Friday morning in Delhi, 1…

  New Delhi: It was a fo…

SC extends deadline for Aadhaar …

  New Delhi: The Supreme…

We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक खनिज विकास निधी अंतर्गत सादर करावे – हंसराज अहिर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील उपलब्ध असणाऱ्या सर्व योजना पूर्णक्षमतेने कार्यरत करण्यात याव्या. रखडलेल्या योजनांचे सर्वेक्षण करुन गरज पडल्यास खनिज विकास निधीअंतर्गत यासंदर्भातील अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे दिले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भद्रावती पंचायत समिती सभागृहात आयोजित जनसंपर्क दिवस कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा योजनांमधील अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. तालुक्यातील चारही जिल्हा परिषद क्षेत्रातील बंद असलेल्या, पाणीस्त्रोत नसलेल्या, स्त्रोत उपलब्ध असूनही पर्याप्त पेयजल नसलेल्या सर्व योजनांचे तातडीने नियोजन करून पाणीपुरवठा योजनांचा नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी दिले.

दि. 29 नोव्हेंबर रोजी आयोजित या जनसंपर्क दिन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, पं.स. सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, जि.प.सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्य प्रवीण सूर, पं.स. सदस्य प्रवीण ठेंगणे, नाजूका मंगाम, महेश टोंगे, नरेंद्र जिवतोडे, वरोराचे उपविभागीय अधिकारी भुसारी, तहसीलदार शितोडे, संवर्ग विकास अधिकारी तुपे, डॉ.एम.जे. खान, विजय राऊत, राहुल सराफ, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या प्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अहिर यांनी या तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक खनिज विकास निधी अंतर्गत सादर करावेत असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. पाणीपुरवठा योजना नागरिकांना सक्षमतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी भुजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत पाणी स्त्रोतांच्या उपलब्धतेसाठी सर्वेक्षण करवून तसे अहवाल तातडीने उपलब्ध होतील याचीही खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचना केली.

या तालुक्यातील नळ योजनांच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अन्य यंत्रणांनी तात्काळ आराखडा तयार करवून घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आढावा घ्यावा, असेही श्री. अहीर यांनी या बैठकीमध्ये निर्देशित केले.

पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसलेल्या पाणीपुरवठा योजनांची तसेच ही कामे पूर्ण झालेल्या योजनांची सविस्तर माहितीही संबंधितानी त्वरित सादर करावी तसेच ज्या गावामध्ये पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी लोकांना पाणीटंचाईची अडचण निवारणार्थ टॅंकरद्वारा त्वरेने पाणीपुरवठा होईल अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना श्री. अहीर यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*