BJP declares Himachal list, Dhum…

  New Delhi: Former Chie…

Explain Modi's chartered air tra…

ArrayNew Delhi: The Congr…

Delhi CM announces compensation …

  New Delhi: Delhi Chief…

Rahul condemns RSS leader's kill…

  New Delhi: Congress Vi…

'Silo mentality' a bottleneck in…

  New Delhi: Prime Minis…

Metro till 10 on Diwali night

  New Delhi: Delhiites c…

Pranab admits eyeing PM's post, …

  New Delhi: Former Pres…

There are no Muslim or Christian…

  Imphal: There are no M…

Cool Wednesday morning in Delhi

  New Delhi: It was a co…

Modi greets nation on Dhanteras

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

राज्यातील कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail
  • राजकुमार बडोले

मुंबई, दि. 27 :गेले काही वर्षे प्रलंबीत असलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात येईल. सुमारे दोन लाख 85 हजार अर्ज प्रलंबित होते. ही सर्व प्रकरणे निकाली लावून शिष्यवृत्तीची सर्व रक्कम देण्यात येईल. तसेच या वर्षीपासून कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यासाठी डी. बी. टी. हे वेब पोर्टल सुरु करण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

शिष्यवृत्ती देण्यासाठी विलंब का लागला, या उपप्रश्नाचे उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले, शिक्षणशुल्क समितीने अनेक महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले नव्हते. शुल्क निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयांकडून आलेले अनेक अर्ज अपूर्ण होते. या शिवाय इतर तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्ती देण्यास विलंब लागला. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळाला असल्याने टप्प्याटप्प्याने प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही कार्यवाही दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले, निरंजन डावखरे, हरिभाऊ राठोड, नागो गाणार, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये आणि धनंजय मुंडे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*