Chief Secretary row: Delhi Polic…

  New Delhi: Chief Minis…

Misty Wednesday morning in Delhi

  New Delhi: It was a mi…

LS Speaker visits Lilavati over …

  New Delhi: Lok Sabha S…

Delhi Chief Secretary row: AAP M…

  New Delhi: Aam Aadmi P…

Meghalaya government failed to t…

  Mawshynrut (Meghalaya)…

IT notice to Singhvi's family po…

  New Delhi: The Congres…

India best placed to leverage te…

  Hyderabad: Prime Minis…

Hardik may campaign for MP polls

  Bhopal: Gujarat's Pati…

Journalist who wrote about Parri…

  Panaji: A journalist w…

NCP candidate among 4 killed in …

  Shillong: Four people,…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

राज्यस्तरीय मौखीक आरोग्य तपासणी मोहिमेचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे

आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

 

मुंबई.दि. 1 :- ‘मौखिक कर्करोग मुक्त राज्य’ करण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रयत्न असून यासाठी राज्यस्तरीय मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे केले.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 1 ते 31 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उदघाटन  आजआरोग्यमंत्रीडॉ. सावंतयांच्याहस्तेझाले,त्यावेळीश्रीसावंतबोलतहोते.

कार्यक्रमात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ.सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ.साधना तायडे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ.पंकज चतुर्वेदी,इंडियन डेंटल असोसिएशनचे सचिव अशोक ठोबळे, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.

श्री सावंत पुढे म्हणाले,मौखिक आरोग्य तपासणी ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहीम आहे. तपासणी महिनाभर होणार असली तरी ही संपूर्ण तीन टप्प्यात चालणारी प्रक्रिया आहे.तपासणी नंतर निदान व उपचार असा हा कार्यक्रम असणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास  हाएकसंपूर्णदेशासाठी आदर्श  ठरेल.

सर्वांत उत्तम संदेशदूत हे शालेय विद्यार्थी असतात.त्याच्या माध्यमातून ही मोहीम घराघरात पोहोचावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे श्री सावंत  म्हणाले.

तत्पूर्वी समुपदेशन पुस्तिका तसेच घडी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी तर आभार आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ सतिश पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*