INTACH report points to hurdles …

  New Delhi: The Indian …

SC bench headed by CJI to hear L…

  New Delhi: The Supreme…

Aadhaar seeding to eliminate mul…

  Kolkata: The Employees…

Tension grips J&K's border r…

  Jammu: Tension gripped…

Include millets in daily diet to…

  Bengaluru: With an vie…

Unfortunate that past government…

  New Delhi: It is the m…

EVMs to have candidates' picture…

  Jaipur:The Electronic …

SC upholds acquittal of 'Pipli L…

  New Delhi: The Supreme…

Karti Chidambaram questioned for…

  New Delhi: Karti Chida…

Decentralise powers in governmen…

  New Delhi: Delhi Chief…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

प्रदुषणमुक्त महाराष्ट्र करण्याचे प्रविण पोटे – पाटील यांचे आवाहन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि.२२ : प्रदुषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. २०२२ पर्यंत प्रदुषणमुक्त महाराष्ट्र करण्याचे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रविण पोटे – पाटील यांनी केले

ते आज पर्यावरण विभागातर्फे आयोजित एक दिवसीय ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र २०२२’ या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ही कार्यशाळा हॉटेल ताज प्रेसिडंट येथे पार पडली.

श्री. पोटे-पाटील म्हणाले, देशात १२३ शहरे प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. प्रदुषण मुक्तीसाठी शासन आपल्या स्तरावर विविध उपाययोजना करीत असले तरी प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. महानगरपालिकेने २५ टक्के निधी प्रदुषणाव्यतिरिक्त महत्वाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महापौर यांनी हे काम मिशन म्हणून हाती घेतले पाहिजे. ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. हा प्रश्न जगातील अनेक राष्ट्रांना भेडसावत आहे. म्हणूनच आपल्या शहरात, गावात, शाळेत, समाजात आणि कुटुंबात याविषयी जागृती झाली पाहिजे. सांडपाणी, कचरा यांची योग्यरित्या विल्हेवाट लावली पाहिजे.

अप्पर मुख्य सचिव सतीश गवई म्हणाले, आपल्याकडे वाहनांचे आणि कारखान्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. ते थांबविणे गरजेचे आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी प्रदुषणावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. नव्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, स्वच्छ रस्ते देणेही आपली जबाबदारी आहे. महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांनी आपले शहर १०० टक्के कसे स्वच्छ होईल, प्रदूषण कसे थांबेल यावर कामाला सुरुवात करणे चांगल्या समाजासाठी, उद्याच्या स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे

प्रारंभी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे डॉ. पी. अनबलगण यांनी प्रास्ताविकातून शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र २०२२ या विषयावरील परिषेदेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र आणि हवा गुणवत्ता निर्देशांक या घडी पुस्तिकेचे प्रकाशन श्री.पोटे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर वायू गुणवत्ता व्यवस्थापन योजना, महाराष्ट्रातील वायूची गुणवत्ता, सुरत मधील वायू गुणवत्ता, आरोग्य क्षेत्र नियोजन, परिवहन क्षेत्र नियोजन, औद्यगिक क्षेत्र नियोजन, ध्वनी प्रदूषण क्षेत्र नियोजन, महाराष्ट्रातील शहरातील प्रदूषण नियंत्रण, भविष्यातील कृती आराखडा या विषयाच्या अनुषंगाने देशभरातून आलेल्या अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.

या परिषदेला केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस.पी.एस परिहार, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रा. वीरेंद्र शेटी, विविध महानगरपालिकेचे महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

निकृष्ट हवा असणारी १७ शहरे

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील ज्या शहरामध्ये हवा गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे यांची नावे पुढीलप्रमाणे : अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर व उल्हासनगर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*