Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

Foggy Friday morning in Delhi, 1…

  New Delhi: It was a fo…

SC extends deadline for Aadhaar …

  New Delhi: The Supreme…

We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक बंदी आवश्यक ; जनजागृतीवर भर देण्याचे पर्यावरणमंत्री यांचे आवाहन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

पुणे,दि.29 : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्य प्लॅस्टिकमुक्त करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक बंदी कायद्याची निर्मिती करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. राज्य प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याबरोबरच लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत विधानभवन येथे पुणे महसुली विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी तसेच पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबरच प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापरणाऱ्यावर कारवाई करण्याबरोबरच अशा वस्तूंचे उत्पादन थांबविण्याबाबत तसेच उत्पादन करणाऱ्या उद्योजकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकच्या दैनंदिन वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यामध्ये आपण सर्वजण जबाबदार घटक असून प्लॅस्टिकबंदीची सुरुवात मी स्वतःपासून केली आहे. आपणही स्वतः चे घर, कार्यालयात प्लॅस्टिक शिवाय अन्य वस्तूंच्या वापरावर भर देऊन इतरांनाही याबाबत प्रेरित करावे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे राबविण्यात येत असलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. कदम यांनी पाचही जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी प्लॅस्टिक वापराबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन प्लॅस्टिक बंदीबाबत विविध सूचनांवर चर्चा केली. श्री. कदम म्हणाले, प्लॅस्टिकबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत विचार करता येईल. प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायत अभियान, प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायती, महानगरपालिकांना रोख रकमेची बक्षीसे देण्याबाबत विचार करता येईल. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरावर भर देण्यासाठी प्रथम या पिशव्या मोठ्या प्रमाणात तयार कराव्या लागतील. हे काम बचतगटातील महिलांना दिल्यास महिलांना रोजगार मिळेल व कापूस उत्पादित शेतकऱ्यांनाही फायदा होईल.
पर्यावरण रक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घ्यावा, असे सांगून सांडपाण्याची विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड व वृक्षसंगोपन करून फळझाड लागवाडीवर भर, कचऱ्यापासून खतनिर्मिती अशा विविध विषयांचा आढावा श्री. कदम यांनी यावेळी घेतला.
दैनंदिन जीवनात प्लॅस्टिक चमचे, खाण्याच्या प्लेट्स, कॅरी बॅग्स आदी माध्यमातून घराघरातून प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदी घालणे आवश्यक आहे, असे डॉ. श्री. अनबलगन यांनी केले.
श्री. दळवी यांनी आभार व्यक्त करून प्लास्टिक बंदीची सुरुवात आजपासूनच पुणे विभागात करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी श्री. दळवी तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी आपल्या सूचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*