Himachal CM lays foundation ston…

  Shimla: With the Himac…

Jawaharlal Nehru Port Trust wins…

Mumbai: Jawaharlal Nehru …

Jaitley to hold brainstorming me…

  New Delhi: Finance Min…

Naidu, Manmohan to speak at lead…

  Hyderabad: Vice Presid…

“We are shrinking into a Hindu m…

  New Delhi: At a time w…

We want whole world to come to I…

  New Delhi: The Indian …

Solution to 'Assam problem' befo…

  Guwahati: ULFA might h…

Shankersinh Vaghela announces th…

  Ahmedabad: Rebel Congr…

Fire in Lucknow school, no injur…

Lucknow: A fire broke out…

'Normalisation of India-Denmark …

  Copenhagen: Normalisat…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

ऑलिम्पिक व्हिजन कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील खेळाडूंची वैयक्तिक माहिती पाठवा

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.24:राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन 2020, 2024,2028 आणि 2032 यावर्षात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत अधिकाधिक महाराष्ट्रातील खेळाडूंनी सहभागी होऊन प्राविण्य मिळवावे यादृष्टीने राज्याचा ऑलिम्पिक व्हिजन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्यातील जिल्हानिहाय प्राविण्यप्राप्त सर्व गटातील खेळाडूंची वैयक्तिक आणि खेळाबाबत माहिती पाठवावी, असे आवाहन प्र. आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ॲथलेटिक्स, ॲक्वेटिक, सायकलिंग/ट्रायथलॉन, हॉकी, फूटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, कुस्ती,वेटलिफ्टींग, शूटींग, ज्युदो, कबड्डी, खो-खो, तायक्वाँदो, टेनिस, क्रिकेट, सॉफ्टबॉल, बुध्दीबळ, योगा आणि तलवारबाजी हे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची माहिती संकलित करण्यात येत आहे.

खेळाडूंची वैयक्तिक आणि खेळाबाबत माहिती एकत्रित होण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे.हा गुगल फॉर्म (विहित अर्ज नमुना) शालेय शिक्षण विभागाच्या http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर http://goo.gl/GNcsBN या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील सर्व गटातील प्राविण्य प्राप्त खेळाडू, पालक, शाळा/महाविद्यालय/संस्था/मंडळे, त्यांचे प्रशिक्षक यांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी आणि त्याची एक कॉपी आपल्या संबंधित जिल्हा क्रीडा मंत्रालयाकडे आपल्या छायाचित्रासह सादर करावी.

सन 2016-17 मधील सर्व गटाच्या खेळ निहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा, अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे प्राविण्यप्राप्त खेळाडू, शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन स्पर्धा आणि वर्ल्ड विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, द्वितीय अणि तृतीय व सहभाग असलेले यांची माहिती तसेच दिव्यांग खेळाडूंनी (पॅरा गेम्स- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय) आपली कामगिरी फॉर्ममध्ये देण्यात आलेल्या खेळप्रकारानुसार द्यावी. याबाबत काही अडचण असल्यास आपल्या संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे संपर्क साधावे असे प्र. आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*