India best placed to leverage te…

  Hyderabad: Prime Minis…

Hardik may campaign for MP polls

  Bhopal: Gujarat's Pati…

Journalist who wrote about Parri…

  Panaji: A journalist w…

NCP candidate among 4 killed in …

  Shillong: Four people,…

Clear sky in J&K cause sub-z…

  Jammu/Srinagar: A clea…

Partly cloudy sky on Monday

  New Delhi:It was a par…

Canadian PM visits Mathura wildl…

  Lucknow: Canadian Prim…

'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

नववर्षात नाट्यगृह खुले करण्यासाठी अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

जळगाव – नवीन वर्षात जिल्ह्यातील नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुले करावयाचे आहे. येत्या एक महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत नाट्यगृहाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी शहरातील महाबळ परिसरात बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार स्मिताताई वाघमहापौर ललीत कोल्हेजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरसहायक जिल्हाधिकारी जलज शर्मासार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणेतहसीलदार अमोल निकम यांच्यासह सार्वजनिक विभागाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी नाट्यगृहाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच अपूर्ण असलेल्या कामांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारास दिल्या. सद्यपरिस्थितीमध्ये शहरातील नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिकची व रंगरंगोटीची कामे सुरु असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

नवीन वर्षात नाट्यगृह नाट्य रसिकांसाठी खुले करुन पहिले दहा प्रयोग नाममात्र फी घेऊन नाट्य रसिकांना दाखविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घेण्याचा विचार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*