BJP declares Himachal list, Dhum…

  New Delhi: Former Chie…

Explain Modi's chartered air tra…

ArrayNew Delhi: The Congr…

Delhi CM announces compensation …

  New Delhi: Delhi Chief…

Rahul condemns RSS leader's kill…

  New Delhi: Congress Vi…

'Silo mentality' a bottleneck in…

  New Delhi: Prime Minis…

Metro till 10 on Diwali night

  New Delhi: Delhiites c…

Pranab admits eyeing PM's post, …

  New Delhi: Former Pres…

There are no Muslim or Christian…

  Imphal: There are no M…

Cool Wednesday morning in Delhi

  New Delhi: It was a co…

Modi greets nation on Dhanteras

  New Delhi: Prime Minis…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

नांदेड जिल्ह्यातील डेंग्यू व हिवतापावर नियंत्रण आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल डॉ. दिपक सावंत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई दि 2- नांदेड जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापाचे रूग्ण आढळले असून, त्यासाठी प्लेटलेट्सची व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र, प्लेटलेट्स कमी पडल्यास त्यांचा पुरवठा केला जाईल. या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

नांदेड जिल्ह्यात डेंग्यू व हिवतापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्यासंदर्भात सदस्य अमिता चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. सर्वश्री सदस्य आशिष शेलार, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. सुजीत मिणचेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

डॉ. सावंत म्हणाले नांदेड जिल्ह्यात डेंग्यू चे 392 रूग्ण आढळले असून, त्यासाठी लागणा-या प्लेटलेट्स उपलब्ध करण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. हे प्लेटलेट्स जर कमी पडल्यास त्यांचा पुरवठाही केला जाणार आहे. हिवतापाचे 52 केसेस आढळले असून, संवेदनशिल भागात 3200 मच्छरदाण्यांचेही वाटप करण्यात आले आहे. कर्मचा-यांचा तुटवडा असून, फवारणी कर्मचा-यांना संबंधीत कारवाईसाठी आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर राज्यात पॅरामेडीकल स्टाफ येत्या तीन महिन्यात भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद जिल्हाधिकारी स्तरावर भरण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर डेंग्यू व हिवताप प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचा-यांमार्फत नियमीत ताप सर्व्हेक्षण करण्यात येते. उद्रेकाच्या ठिकाणी जलद ताप रूग्ण सर्व्हेक्षण सुरू आहे. डेंगी रूग्णांना लक्षणाधारीत उपचार करण्यात येतो. सर्व आरोग्य संस्थांना औषधे व इतर साधन सामुग्रीचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिन, डेंग्यू प्रतिरोध महिना व शालेय डेंग्यू जागृती मोहीम तसेच जागतिक दिन व हिवताप प्रतिरोध महिना याद्वारे जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*