UP CM urged to allow state buses…

  Lucknow: Apex industry…

Rains boost paddy sowing in Jhar…

  Ranchi: Incessant rain…

Ram Nath Kovind pays homage to M…

  New Delhi: President-e…

Lok Sabha adjourned till 3 p.m.

  New Delhi: The Lok Sab…

Kovind sworn in as India's 14th …

  New Delhi: Ram Nath Ko…

Jute products made by correction…

  Kolkata: In a unique i…

678 pilgrims leave for Amarnath …

  Jammu: A fresh batch o…

673 pilgrims leave for Amarnath …

  Jammu: A batch of 673 …

Cloudy Monday morning in Delhi

  New Delhi: It was a cl…

Renowned Indian space scientist …

  Bengaluru: Renowned In…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’चा पाया पुणे महापालिकेने रचला

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 22 : ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या बॉण्ड्‌सच्या माध्यमातुन निधी उभारला जाणार आहे. त्याचा पाया पुणे महापालिकेने रचला आहे. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकीक राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

pune

पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारमधील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री व श्री. नायडू यांच्या हस्ते शेअर बाजाराच्या परंपरेप्रमाणे बेल वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे महापालिकेसह राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. नागरी प्रशासनाच्या कामात परिवर्तन होताना दिसत आहे. विविध पायाभुत सुविधांच्या विकास प्रकल्पांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी नवीन साधनांची गरज भासते. अशावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, महापालिकेन स्वत:चा निधी उभारण्यासाठी शेअर बाजारात बॉण्ड आणावेत. या आवाहनाला सकात्मक प्रतिसाद देत 2264 कोटी रुपयांच्या बॉण्ड पुणे महापालिकेने गुंतवणुकीसाठी दाखल केले आहेत. पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली असून या बॉण्डच्या माध्यमातून जो निधी उभारला जाईल त्याद्वारे स्मार्ट पुणे शहर निर्माण होईल. पुणेकरांना 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, उत्तम घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

दृष्टीकोन बदलून शहर विकासाचे प्रकल्प तयार करावेत आणि कार्यक्षम व पारदर्शक पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कार्यक्षमतेत अधिकच भर पडणार आहे. देशात म्युनिसिपल बॉण्ड मार्केट विकसित होत आहे. त्याचा पाया पुणे शहराने रचला याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. राज्यात शहरीकरण वेगाने होत आहे. अशावेळेस नागरिकांना अधिक चांगल्या सोयी देण्यासाठी नागरी प्रशासनात महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर राहील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या दोन ते तीन वर्षात पुणे शहरामध्ये घनकचऱ्याचे विलगीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रत्येक थेंबावर प्रक्रिया केली जाईल. मेट्रो आणि सार्वजनिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. पुणेकरांना 24 तास पाणी पुरवठा केला जाईल. जलवाहिन्यांसोबत फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे पुणे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा

– केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, आज शेअर बाजारात घंटी वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. या घंटीतून निघालेला नागरी सुधारणेचा प्रतिध्वनी देशभर घुमण्यास मदत होणार आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करुन श्री. नायडू म्हणाले की, शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. केंद्र शासनातर्फे देशभरात शहर विकासाकरीता 4.13 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय सहाय मिळाल्यावर त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभाग दिला पाहिजे. त्याचबरोबर शहरांनी आणि त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:चा निधी उभारणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांच्या सुधारणांवर भर देण्यात येत आहे. जी शहरे अधिक चांगल्या पद्धतीने विकासाची कामे करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के निधी देण्यात येईल.

naydu

केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. मेघवाल म्हणाले की, 2017 हे वित्तीय सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. देशातील व्यवहार डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आले आहे. देशामध्ये 91 लाख नवीन करदात्यांची यामुळे भर पडली आहे.

श्री. बापट म्हणाले की, नगरविकासाच्या क्षेत्रात पुणे महापालिकेने नवीन विक्रम केला आहे. बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीमती भट्टाचार्य, ‘सेबी’चे अध्यक्ष श्री. त्यागी, मुंबई शेअर बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविक केले.

या बॉण्डच्या माध्यमातून 2264 कोटी रुपये पुणे महापालिका उभारणार असून या द्वारे उभारलेल्या निधीतून 24×7 पिण्याचा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पुढील 30 वर्ष पुणेकरांना शुद्ध, स्वच्छ पाणी यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी प्रकल्प, जलवाहिन्या आदी कामे केली जाणार आहे.

या सोहळ्यास पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनीधी, वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*