Unitech seeks stay of NCLT order…

  New Delhi: Real estate…

Airtel launches 4G in Kargil, Le…

  New Delhi: Bharti Airt…

Congress confident of forming go…

  Ahmedabad: Congress le…

Modi takes seaplane on last day …

  Ahmedabad: Prime Minis…

Higher fiscal deficit due to Bud…

  New Delhi: Government'…

Government prioritising homoeopa…

  Kolkata: Union Ministe…

Bengaluru metro rail to connect …

  Bengaluru: Bengaluru m…

Bollywood, sports stars wish Vir…

  Mumbai: From megastar …

Modi, Rahul's road shows in Ahme…

  Ahmedabad: Scheduled r…

Manali gets season's first snowf…

  Shimla: Snowfall conti…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

मलकापूर येथे दोन स्वतंत्र नियमित न्यायालये

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मलकापूर (जि. बुलढाणा) येथे कार्यरत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोड न्यायालयांऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशी दोन स्वतंत्र न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्वतंत्र न्यायालयांमुळे या तालुक्यातील नागरिकांची सोय होणार असून न्यायप्रक्रिया गतिमान होणार आहे.

मलकापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांचे जोड न्यायालय ही दोन्ही न्यायालये 28 नोव्हेंबर 2009 पासून अस्तित्वात आहेत. बुलढाणा येथे नेमणूक असलेल्या न्यायाधिशांनाच स्वत:च्या कर्मचाऱ्यांसह मलकापूर येथे 15 दिवस जाऊन या जोडन्यायालयांचे कामकाज करावे लागत होते. ही जोडन्यायालये स्वतंत्र स्वरुपात कार्यरत करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्च न्यायालयाने मान्यता दर्शविली आहे. त्यानुसार मलकापूर येथे जोड न्यायालयाऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशी दोन स्वतंत्र न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच या न्यायालयांच्या कामकाजासाठी पदनिर्मिती करण्यासदेखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 13 नियमित पदे तर दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांच्यासाठी 19 नियमित पदे अशी एकूण 32 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*