Tension grips J&K's border r…

  Jammu: Tension gripped…

Include millets in daily diet to…

  Bengaluru: With an vie…

Unfortunate that past government…

  New Delhi: It is the m…

EVMs to have candidates' picture…

  Jaipur:The Electronic …

SC upholds acquittal of 'Pipli L…

  New Delhi: The Supreme…

Karti Chidambaram questioned for…

  New Delhi: Karti Chida…

Decentralise powers in governmen…

  New Delhi: Delhi Chief…

Kashmir reels under 'Chillai Kal…

  Srinagar: Minimum temp…

Tamil Nadu to come out with aero…

  Chennai: Tamil Nadu Ch…

'Padmaavat' row: Karni Sena 'wil…

  Jaipur: Even as the Su…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

मलकापूर नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना लवकर मार्गी लावणार – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 22 : मलकापूर शहरातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेचा शासनस्तरावर पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे पाणीपुरवठावस्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितले.

मलकापूर (जि.कोल्हापूर) नगरपरिषद अंतर्गत पाणीपुरवठा आणि विविध विकासकामांच्या मंजुरीबाबत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्यासह मुख्याधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री श्री.खोत यांनी सांगितले, मलकापूर नगरपरिषदेच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे असून, याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील आणि प्रधान सचिव यांची  बैठक आयोजित करण्यात येऊन त्यात निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

मलकापूर शहरातील विविध विकासकामांसाठी आलेल्या निधीपैकी अखर्चीत निधी पुन्हा खर्च करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने केली. त्यावर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री.खोत यांनी सांगितले. तसेच विविध विकासकामे करण्यासाठी विकास आराखडा तयार करून वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*