Virbhadra accepts Congress' defe…

  Shimla: Himachal Prade…

When Raghu Rai was 'captured' by…

  New Delhi: As Raghu Ra…

Congress should take all parties…

  New Delhi: Samajwadi P…

Gujarat trends are heartening: T…

  New Delhi: Congress le…

LS adjourned for the day over Mo…

  New Delhi: The Lok Sab…

10 killed in Mumbai shop blaze

  Mumbai: At least 10 pe…

Gujarat results would have been …

  New Delhi: Nationalist…

Lok Sabha adjourned till noon

  New Delhi: The Lok Sab…

My plan is to transform Congress…

  New Delhi: Congress Pr…

Vote count in Himachal begins

  Shimla: Counting of vo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

‘महाराष्ट्र अहेड’चे केले प्रधानमंत्र्यांनी कौतुक

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई,दि. 17 : केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रधानमंत्र्यांनी आज जाहीर कौतुक केले. प्रधानमंत्री कार्यालयाच्या @PMOIndia या व्ट‍िटर हँडलवरून ‘थ्री इयर्स ऑफ रिबिल्डींग इंडिया’ या विशेषांकाची पाठराखण  प्रधानमंत्र्यांनी केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास व प्रगतीत घेतलेल्या भरारीचा विस्तृत आढावा या अंकात घेण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘भारताचे नवनिर्माण’ या लेखाचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने केलेल्या उत्तुंग कामगिरीचे विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी या लेखात केले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या खात्यांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे लेख व मुलाखती यांच्या या अंकात समावेश आहे. गेल्या तीन वर्षात राज्य शासनाला केंद्राकडून करण्यात आलेली मदत, केंद्र शासनाने पारदर्शी कारभारासाठी केलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर लेख या अंकात आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ‘लोकराज्य’ मासिक प्रकाशित करण्याची दीर्घ परंपरा आहे. केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महासंचालनालयाच्यावतीने मे 2017 चा ‘लोकराज्य’चा मराठी, हिंदी, उर्दु, गुजराती या भाषांमध्ये आणि इंग्रजीमध्ये ‘महाराष्ट्र अहेड’ या नियतकालीकाचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*