Akhilesh hints at contesting Lok…

  Lucknow: Former Uttar …

Goel for security to man who too…

  New Delhi: Minister of…

Devendra Fadnavis joins PM at Da…

  Mumbai: Maharashtra Ch…

Kerala Governor skips anti-Centr…

  Thiruvananthapuram: Ke…

J&K considering amnesty to s…

  Jammu: Jammu and Kashm…

Will not allow 'Padmaavat' scree…

  Jaipur: Shri Rajput Ka…

Indian Navy's all-women sailing …

  Port Stanley (Falkland…

Loya issue 'serious', will exami…

  New Delhi: The Supreme…

Javi Gracia named Watford coach

  London: Watford Footba…

Delhi Assembly to get a dose of …

  New Delhi: On a Januar…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

लंडन आणि महाराष्ट्रातील शहरांमध्ये विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. 11 : लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे, त्याला कनेक्टिव्हीटी देणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी आदी संदर्भात यावेळी चर्चा झाली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबई शहरात प्रभावी आणि सुलभ परिवहन व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याशिवाय परवडणारी घरे आणि स्मार्ट सिटींची निर्मिती हाही राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. लंडन शहराने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल

लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यावेळी म्हणाले, लंडन शहरात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी स्वतंत्र चिफ डिजिटल ऑफिसर नेमण्यात आला आहे. सध्याच्या मुलभूत सुविधा वापरूनच शहराची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी, परवडणारी घरे, सक्षम परिवहन व्यवस्था यासह विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. दोन्हीकडील वेगवेगळ्या नवकल्पनांचे आदान – प्रदान करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, नितीन करीर यांच्यासह लंडनमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*