UP CM urged to allow state buses…

  Lucknow: Apex industry…

Rains boost paddy sowing in Jhar…

  Ranchi: Incessant rain…

Ram Nath Kovind pays homage to M…

  New Delhi: President-e…

Lok Sabha adjourned till 3 p.m.

  New Delhi: The Lok Sab…

Kovind sworn in as India's 14th …

  New Delhi: Ram Nath Ko…

Jute products made by correction…

  Kolkata: In a unique i…

678 pilgrims leave for Amarnath …

  Jammu: A fresh batch o…

673 pilgrims leave for Amarnath …

  Jammu: A batch of 673 …

Cloudy Monday morning in Delhi

  New Delhi: It was a cl…

Renowned Indian space scientist …

  Bengaluru: Renowned In…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

             मुंबई :सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यांतील 288 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.

            बांधकामादरम्यान दरसूचीतील बदलजास्त दराची निविदा स्वीकृतीभूसंपादनाच्या वाढलेल्या किंमती (विशेषत: नवीन भूसंपादन कायद्यामुळे)संकल्पचित्रातील बदलअपुऱ्या तरतुदी तसेच इतर अनुषंगिक खर्चामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली आहे. या कारणांमुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने 2013-14 च्या दरसूचीवर आधारित चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल सादर केला. या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-2 ची शिफारस आहे.  त्यानुसार प्रकल्पाच्या एकूण 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता देण्यात आली.

            कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असून या प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. ताकारी उपसा सिंचन योजनेचा उद्‌भव कृष्णा नदीवर ताकारी गावाजवळ आहे. या योजनेद्वारे एकूण 4 टप्प्यामध्ये 9.34 अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील खानापूर,तासगावमिरजपलूसकडेगाववाळवा या तालुक्यांतील एकूण 27 हजार 430 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजित आहे.

            म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा उद्‌भव कृष्णा नदीवर म्हैसाळ गावाजवळ आहे. या योजनेद्वारे एकूण 6 टप्प्यामध्ये 17.44 अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरजकवठेमहांकाळतासगावजत आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील एकूण 81 हजार 697 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.

            कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण 1 लाख 9 हजार 127 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण पाणी वापर 26.78 अब्ज घनफूट इतका आहे. यापैकी कोयना धरणातून 19.07 अब्ज घनफूट व कृष्णा नदीतून 7.71 अब्ज घनफूट इतका पाणी वापर नियोजित आहे.

            केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश असून या प्रकल्पासाठी जानेवारी 2004 मध्ये 1982 कोटी 81 लाख खर्चास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*