Rahul Gandhi's hands full of cha…

  New Delhi: Anticipated…

Land most sought asset of Salem …

  Chennai: Tamil Nadu Ch…

Tripura CM urges Bangladesh to o…

  Chottakhola (Tripura):…

Policeman trains gun at Kamal Na…

  Chhindwara (Madhya Pra…

SC imposes Rs 1 lakh cost on NGO…

  New Delhi: The Supreme…

Modi to visit Ockhi-hit fishing …

  Thiruvananthapuram: Af…

Rahul's impending takeover spark…

  New Delhi: Scores of R…

President offers prayers at Sang…

  Lucknow: On the second…

Recognise Jerusalem as Palestine…

  Hyderabad: MIM chief A…

Three years jail for Jharkhand e…

  New Delhi: A court her…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

कोंडी ग्रामविकासाचे मॉडेल ठरेल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन  

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

सोलापूर, दि. 01 :-समाधान स्वंयपूर्ण दत्तक खेडेगांव योजनेमुळे कोंडी गावाच्या सर्वांगीण विकास होईल. हे गांव देशात विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, अशा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज व्यक्त केला.

कोंडी-गावचे-ग्रामस्थ, जिल्हा नियोजन समिती तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्या वतीने आयोजित समाधान स्वंयपूर्ण दत्तक खेडेगाव योजनेतील विविध विकास कामे आणि शहीद स्फुर्ती स्थळ  भुमीपूजनसमारंभआजपालकमंत्रीदेशमुखयांच्याहस्तेझाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एस.मालदार, सरपंच चंद्रभागा वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, डॉ.शकंर नवले, संजय नवले, देविदास शेळेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘ गावे स्वयंपूर्ण झाली तरच खरा विकास होईल. कारण आज शिक्षण, रोजगार अशा अनेक गरजांसाठी गावांकडून शहराकडे स्थलांतर होत आहे. गावातच तरुणांच्या हाताला काम मिळाले तर रोजगारासाठी शहराकडे वाढणारा ओघ कमी होईल. त्याचबरोबर वाढत्या शहरीकरणालाही आळा बसेल. गावातील मनुष्य बळ गावातच राहिल्यामुळे गावाच्या विकासाला अधिक गती येईल ’.

‘ गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याची आवश्यकता विकासाच्या प्रक्रियेत लोकसहभाग आवश्यक आहे. कारण लोकसहभागा मूळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे. त्याचप्रमाणे कोंडी गावाचा विकास लोकसहभागामुळे होईल’ असे श्री.देशमुख म्हणाले.

यावेळी डॉ. विजय भटकर यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांचेही भाषण झाले. श्री. नानासाहेब कदम यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमानंतर कोडी आणि हिरज येथे समाधान स्वयंपूर्ण दत्तक खेडेगाव योजना राबविण्याबात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली  बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस प्रमुख वीरेश प्रभू, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*