Unitech seeks stay of NCLT order…

  New Delhi: Real estate…

Airtel launches 4G in Kargil, Le…

  New Delhi: Bharti Airt…

Congress confident of forming go…

  Ahmedabad: Congress le…

Modi takes seaplane on last day …

  Ahmedabad: Prime Minis…

Higher fiscal deficit due to Bud…

  New Delhi: Government'…

Government prioritising homoeopa…

  Kolkata: Union Ministe…

Bengaluru metro rail to connect …

  Bengaluru: Bengaluru m…

Bollywood, sports stars wish Vir…

  Mumbai: From megastar …

Modi, Rahul's road shows in Ahme…

  Ahmedabad: Scheduled r…

Manali gets season's first snowf…

  Shimla: Snowfall conti…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

केंद्राच्या आयात – निर्यातविषयक निर्णयांमुळे दाळी, तेलबियांसाठी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार -राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबईदि. 4 : शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने दाळी व तेलबीयांच्या आयात – निर्यातीबाबत विविध 7 महत्वपूर्ण अधिसूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाने यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्राने घेतलेल्या या विविध निर्णयांमुळे शेतकऱ्यांना दाळी व तेलबियांसाठी मिळणाऱ्या भावात वाढ झाली असून डिसेंबरनंतर त्यात अजून भर पडेलअशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज येथे दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

            श्री. पाशा पटेल म्हणाले कीया अधिसुचनेनूसार दि. 5 ऑगस्ट 2017 रोजी केंद्र सरकारने 2 लाख टनांपेक्षा जास्त तूर आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 11 ऑगस्ट 2017 रोजी मलेशियाअर्जेंटीना इत्यादी देशातून आयात होणाऱ्या खाद्यतेलावर 10 टक्के आयात शुल्क आणि सोयाबिन तेलावर 5 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दि. 21ऑगस्ट 2017 रोजी मुग आणि उडीद हे 3 लाख टनांपेक्षा जास्त आयात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 15 सप्टेंबर, 2017 रोजीच्या अधिसूचनेनुसार उदीड आणि मुग डाळींच्या निर्यातीवरील बंदी पुर्णपणे उठविण्यात आली आहे. दि. 8 नोव्हेंबर, 2017 रोजी पिवळ्या मटारवर 50 टक्के आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 16 नोव्हेंबर 2017 रोजी केंद्र सरकारने अधिसूचना काढून सर्व प्रकारच्या डाळीवरील निर्यात बंदी उठविली आहे. 17 नोव्हेंबर, 2017 रोजी केंद्र शासनाने अधिसूचना काढून आयात होणाऱ्या क्रूड पामतेलरिफाईन पामतेलक्रूड सुर्यफुल तेलरिफाईन सुर्यफुल तेलक्रूड सोयाबिन तेलरिफाईन सोयाबिन तेलक्रूड रेपसीड मोहरी कनोला तेलरिफाईन रेपसीड मोहरी कनोला आदी प्रकारच्या तेलांवर आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

            1 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, नितीन गडकरी, रामविलास पासवान, केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा, प्रधानमंत्री कार्यालयाचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीतही या अनुषंगाने महत्वाचे निर्णय झाले, असेही श्री. पटेल यांनी यावेळी सांगितले.

            केंद्र सरकारच्या डाळी व तेलबीयांच्या आयात – निर्यातीसंदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावात वाढ झाली आहे. सोयाबीनसाठी ६ नोव्हेंबर रोजी किमान बाजारभाव हा २ हजार १५० रुपये इतका होता. तो ४ डिसेंबर रोजी २ हजार ७५० इतका झाला आहे. तसेच या काळात उडीदाच्या बाजारभावात ३ हजार १०४ रुपयांवरुन ३ हजार ५२० रुपये इतकी वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या आयात – निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मिळणाऱ्या बाजारभावात यापुढील काळात अजून भरीव वाढ होईलअसे श्री. पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*