Unitech seeks stay of NCLT order…

  New Delhi: Real estate…

Airtel launches 4G in Kargil, Le…

  New Delhi: Bharti Airt…

Congress confident of forming go…

  Ahmedabad: Congress le…

Modi takes seaplane on last day …

  Ahmedabad: Prime Minis…

Higher fiscal deficit due to Bud…

  New Delhi: Government'…

Government prioritising homoeopa…

  Kolkata: Union Ministe…

Bengaluru metro rail to connect …

  Bengaluru: Bengaluru m…

Bollywood, sports stars wish Vir…

  Mumbai: From megastar …

Modi, Rahul's road shows in Ahme…

  Ahmedabad: Scheduled r…

Manali gets season's first snowf…

  Shimla: Snowfall conti…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

कासेगाव, केदारवाडीत शासन आपल्या दारी उपक्रमास प्रतिसाद

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

सांगली : सर्वसामान्य माणसाच्या अडचणींचे निराकरण व्हावेयासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यावेअसे निर्देश कृषि व फलोत्पादनपणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

वाळवा तालुक्यातील कासेगाव आणि केदारवाडी ता. वाळवा गटात शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधवगट विकास अधिकारी राहुल रोकडेतालुका कृषि अधिकारी भगवान मानेमहावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. कोळीभूमिअभिलेख विभागाचे श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

वाळवा तालुक्यात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या. यामध्ये नळजोडणीवीजजोडणीवारस नोंदीपाणंद रस्तेघरकुल योजनामागेल त्याला शेततळेजलस्वराज्य प्रकल्पप्रधानमंत्री मुद्रा योजनाशिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रारउपसा सिंचन योजना आदिंबाबत ग्रामस्थांनी प्रश्न मांडले.

कृषि व अन्य विभागाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना व्हावीयासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विविध योजनांचे माहिती फलक प्रदर्शित करावेतअसे निर्देश देऊन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणालेविविध शासकीय योजनांचे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. मात्रलाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्यामध्ये काही त्रुटी असतीलतर त्यांची पूर्तता व्हावी. तसेचप्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना अधिकाधिक मिळावायासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकसर्व बँकांचे व्यवस्थापक यांची इस्लामपूर येथे बैठक घेण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणालेवाळवा तालुक्यात कृषि विभागाच्या योजनांतर्गत ट्रॅक्टर व बाबींसाठी आपण सर्वाधिक निधी आणला आहे. याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. मात्रत्यामध्ये ग्रामस्थांना अडचणी येत असतीलतर ग्रामसेवक व तलाठी यांनी त्यांना मदत करावी. तसेचआवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते आणि घरकुल बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने एक लाख, 36 हजार रुपये अनुदान दिले जाते. याचा लाभ घ्यावाअसे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संबंधित गावचे मंडल अधिकारीतलाठीग्रामसेवकतसेच संबंधित विभागाचे अधिकारीग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*