'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

कर्करोगाच्या क्षेत्रात सातत्याने नवे संशोधन होत राहणे गरजेचे – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 21 : मानवी दुःख कमी करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असणा-या आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेल्या संशोधकांनी कर्करोग क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत राहणे गरजेचे आहे. प्राचीन आयुर्वेदामधून काही पर्यायी उपाय मिळू शकतात का हे यासाठीही प्रयत्न करावे. काही कमी खर्चाचे स्वदेशी प्रभावी उपाय जे कर्करोगाच्या उपचारांना अधिक परवडणारे बनविण्यासाठी उपयोगी ठरू शकतील याबाबतीतही संशोधन करण्यात यावे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे सांगितले.

टाटा मेमोरियल सेंटर येथे आयोजित पदवीदान समारंभात ते बोलत होते. होमी भाभा नॅशनल इन्स्टीट्यूट या अभिमत विद्यापीठांतर्गत टाटा मेमोरियल सेंटर येथून कर्करोगावर संशोधन करणा-या विविध विद्यार्थ्यांना यावेळी पदवीदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे, अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव डॉ. शेखर बासू, होमी भाभा नॅशनल इन्स्टीट्यूटचे कुलगुरु पी. आर वासूदेव राव आदी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, देशातील सर्व वैद्यकीय संशोधकांनी प्राचीन भारतीय उपचार पद्धतीवर अधिक संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि कर्करोगावर उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय शोधावे. शालेय जीवनापासूनच, आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात यावे. कर्करोगाचे उपचार अतिशय खर्चिक आहेत. लवकर तपासणी करणे आणि याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने 2016 मध्ये केलेल्या अनुमानानुसार, 2020 पर्यंत नवीन रुग्णांची संख्या 17.3 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तर 2020 पर्यंत कर्करोगाने होणा-या मृत्यूंची संख्या 8.8 लाख पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजही केवळ 12.5 टक्के रुग्ण हे रोगाच्या प्रारंभिक अवस्थेत उपचार घेण्यासाठी येतात असे उपलब्ध डेटावरून लक्षात येते. भारतात स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वात जास्त होतो, तर पुरुषांमध्ये तोंडावाटेचे कर्करोग जास्त झालेले आढळतात. याचे कारण बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोलसारख्या पदार्थांचे वाढते व्यसन याला कारणीभूत आहेत.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलने “नॅव्हिगेशन प्रोग्राम फॉर पेशंट केअर – केवॅट” नावाने सुरु केलेला हा  उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहे. देशात  पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने, एक वर्ष (संपूर्ण वेळ) रुग्ण नेव्हिगेशन संदर्भात प्रशिक्षण (केईव्हीएटी) देण्यात येणार आहे. बरेचदा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना निदान समजत नाही, विविध उपचारांच्या पर्यायांची आणि उपलब्ध संसाधनांची जाणीव नसते. केवॅटमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णाला  योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार होणार आहे.

यावेळी सन 2017-18 या बॅच मधील पदवीधारकांना उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या हस्ते पदवीदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*