'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार – चंद्रकांत पाटील

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 5 : राज्यातील मराठवा़डा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात बोंड आळीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण  करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून या सर्वेक्षणाचा अहवालानंतर बोंड आळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य शासन बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, यंदाच्या वर्षी कापसाच्या दोन वेचण्यांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त कापूस उत्पादित झाला असून तो बाजारात पोचला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत 21 लाख 85 हजार 112 क्विंटल तर यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत 40 लाख 93 हजार 504 क्विंटल कापूस बाजारात पोहचला आहे. मात्र यंदा तिसऱ्या वेचणीच्या वेळी बोंड आळी या रोगामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने या गोष्टीची दखल घेऊन या रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

या सर्वेक्षणानंतर केंद्रीय आपत्ती निवारण कक्षाकडे नुकसान भरपाईसाठी अहवाल पाठविला जाईल. जर त्यांच्या निकषात हे नुकसान बसले नाही तर राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बोंड आळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विम्याद्वारे तसेच राज्य शासनाकडून मदत मिळणार असून त्याचबरोबर ज्या कंपन्यांच्या बियाणांमुळे बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे, या कंपन्यांनीही नुकसान भरपाई देण्याची तयार दर्शविली आहे. धानावर पडलेल्या तुडतुड्या रोगासंबंधीचेही पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून या रोगामुळे झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*