Government's muscular approach o…

  New Delhi: Former Unio…

BJD has mastered art of corrupti…

  Bhubaneswar: Union HRD…

UP to promote religious tourism:…

  Lucknow: Uttar Pradesh…

SP to contest five seats in Guja…

  Lucknow: The Samajwadi…

Gujarat bribery row: Congress se…

  New Delhi: The Congres…

Centre's funds to states not cha…

  Bengaluru: Attacking P…

SC refuses bail to Unitech's San…

  New Delhi: The Supreme…

Rajasthan government tables Crim…

  Jaipur: Despite critic…

There was no recount of Gujarat …

  New Delhi: Senior Cong…

Demonetisation: Economy shaken, …

  New Delhi : While the …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

जिल्हाधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या हस्ते मतदान कार्ड वाटप

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि.27 : नव्याने नोंदणी करण्याऱ्या मतदारांना आता रंगीत मतदान ओळखपत्र (पीव्हीसी) मिळणार असून यापुढे हे ओळखपत्र स्मार्ट कार्ड सारखे असणार आहे. मतदान ओळखपत्र वाटप सुरू झाले असून आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या हस्ते ३५ नवीन मतदारांना कार्ड वाटप करण्यात आले.

वांद्रे येथील सेंट कार्डिनल ग्रेशिअस हायस्कूल येथे जिल्हा निवडणूक कार्यालायद्वारे  तरुण व वंचित मतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र ठाकूर, चेतना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जोशी, कार्डिनल ग्रेशिअस हायस्कूल चे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना श्री. कुशवाह म्हणाले, सक्षम राष्ट्र आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान नोंदणी करणे आवश्यक आहे.वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी भविष्यातील आपला देश कसा असावा हे ठरविण्यासाठी मतदान नोंदणी करून घ्यावी. तसेच परिसरातील नाव तरुणांना मतदान नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आंतरशालेय वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना श्री. कुशवाह यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.तसेच विविध शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

मुंबई,दि.२७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय  महाराष्ट्र’ कार्यक्रमात दादर  येथील श्री.गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक २८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत ही मुलाखत प्रसारीत होईल.ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.

व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारनुकताच देण्यात आला आहे.श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट, दादर  ही संस्था गेल्या तीस वर्षापासून मुंबई व मुंबई उपनगर सोडून बाहेर गावावरून उपचारांसाठी येणा-या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधारवड बनली आहे. या संस्थेचा इतिहास आणि कार्याची माहिती श्री. देशमूख यांनी ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*