Policeman trains gun at Kamal Na…

  Chhindwara (Madhya Pra…

SC imposes Rs 1 lakh cost on NGO…

  New Delhi: The Supreme…

Modi to visit Ockhi-hit fishing …

  Thiruvananthapuram: Af…

Rahul's impending takeover spark…

  New Delhi: Scores of R…

President offers prayers at Sang…

  Lucknow: On the second…

Recognise Jerusalem as Palestine…

  Hyderabad: MIM chief A…

Three years jail for Jharkhand e…

  New Delhi: A court her…

Will Beijing be a stakeholder in…

  Prime Minister Narendr…

Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा मुख्यमंत्र्यांना सादर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. १३ : गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा आज तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्यासहसमितीचे सहअध्यक्ष अविनाश सुर्वे, ह. आ. ढंगारे, समितीचे सदस्य व मेरीचे निवृत्त महासंचालक एम. आय. शेख, वाल्मीचेनिवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, समितीचे सदस्य सचिव एस. एच. खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

जलनियोजनात अहवालाचा निश्चित वापर करु – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी समितीने तयार केलेला हा आराखडाऐतिहासिक असा महत्वपूर्ण दस्तावेज आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी समितीने मोठी मेहनत घेतली असून सविस्तरअभ्यास केला आहे. हा आराखडा योग्य वेळी सादर केला असून तो इतर खोऱ्यांचे जलआराखडे तयार करण्यासाठी मार्गदर्शकठरेल. समितीने गोदावरी खोऱ्यासंदर्भात तयार केलेल्या आराखड्याचा शासन स्विकार करीत असून त्यावर पुढची कार्यवाहीलवकरात लवकर पूर्ण केली जाईल. तसेच राज्यातील इतर खोरी, उपखोरी यांचेही जलआराखडे आपणास तयार करावे लागतील.लवकरच राज्याचा संपूर्ण एकात्मिक जलआराखडा आपण तयार करु. याच आराखड्याचा वापर करण्यात येईल. त्यातीलशिफारशींची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे श्री.फडणवीस म्हणाले.

तसेच, राज्यात १० वर्षात प्रथमच झालेल्या जलपरिषदेच्या बैठकीत हा आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले होते.त्यानुसार हा आराखडा तयार केला आहे. एखाद्या खोऱ्याचा असा अभ्यासपूर्ण आराखडा बनवणारे महाराष्ट्र हे देशातील आघाडीचेराज्य असून राज्यातीलही हा पहिला आराखडा आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

जलनियोजनासाठीचे महत्वपूर्ण पाऊल – केपीबक्षी

समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी सांगितले की, आराखडा तयार करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी मोठी मेहनतघेतली. यासाठी समितीच्या २३ बैठका झाल्या. प्रत्यक्ष खोरे क्षेत्रात वेळोवेळी दौरे करुन समितीने सर्वांगिण जलआराखडा तयारकेला आहे. हा आराखडा दोन खंडांमध्ये असून पहिल्या खंडात कार्यकारी सारांश आहे. दुसऱ्या खंडाचे दोन भाग असून त्यातीलपहिल्या भागात उपखोरे निहाय जलशास्त्रीय अभ्यास, उपखोऱ्यात उपलब्ध असलेली जलसंपत्तीची स्थिती याबाबतचा अभ्याससमाविष्ठ आहे. दुसऱ्या भागात पर्यावरण, पाण्याच्या प्रकल्पाचे अर्थशास्त्र, निधी व संस्थात्मक कामकाजाबाबत शिफारशी यांचासमावेश आहे. हा अहवाल गोदावरी खोऱ्याच्या उपलब्ध पाण्याच्या व पाणीवापराच्या सर्वंकष अभ्यासाचे महत्वपूर्ण पाऊल ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*