BJP, government cheer Moody's ra…

  New Delhi: The ruling …

Government's good work led to Mo…

  New Delhi: Echoing the…

Modi-Moody's fail to gauge natio…

  New Delhi: After Moody…

Railways modify order on Utkal E…

  New Delhi: The Railway…

India to be testing ground for q…

  Bengaluru: If approved…

PAAS leaders in Delhi to meet Co…

  Gandhinagar/New Delhi:…

PM reviews performance of key in…

  New Delhi: Prime Minis…

Mukul Roy moves Delhi HC against…

  New Delhi: BJP's Mukul…

Lawrence, Stone's 'secret' proje…

  Los Angeles: Actresses…

Cabinet approves hike in carpet …

  New Delhi: The Union C…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

 

मुंबई, दि. 22 :  इस्त्राईलने मोशाव पद्धतीची शेती करीत शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये विविध प्रयोग केले आहेत. या सर्व शेती प्रयोगांना जीटूजी (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) धर्तीवर राबविण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

israyal

इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी इस्त्राईलचे कॉन्सुल जनरल डेव्हिड अकॉव यांच्यासह राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार, गृह विभागाचे (अपील व सुरक्षा) प्रधान सचिव श्रीकांत सिं‍ह आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. या भेटीत शिष्टमंडळाने कृषी, गृह आणि नगरविकास विभागाच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली.

इस्त्राईलच्या मोशाव पद्धतीच्या शेतीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल या दृष्टीने प्रयत्न करतानाच शेतीसह शेतीपूरक उद्योग, पशुसंवर्धन आणि इतर विभागांनाही याचा काय फायदा होईल हे तपासले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर तुरुंगात सुरक्षेच्या अत्याधुनिक उपाययोजना करण्यासाठी इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरण्याचाही विचार व्यक्त केला.

अत्याधुनिक पद्धतीचे तुरुंग तयार करताना सुरक्षा आणि अत्याधुनिक यंत्रणा यावर विशेष भर दिला जाईल. इस्त्राईलने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणी, सोलर एनर्जी यासंदर्भातही  इस्त्राईल शासन अहवाल देणार असून नगरपालिकांना नवीन तंत्रज्ञान, प्रयोग कळावेत यासाठी इस्त्राईल महाराष्ट्रास सहाय्य करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राजदूत डॅनिअल कार्मन म्हणाले की, एप्रिल २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्त्राईलला भेट दिल्यानंतर महाराष्ट्र-इस्त्राईलमधील संबंध अधिकच दृढ झाले आहेत. कृषी, गृह आणि नगरविकास विभागाचे प्रकल्प जी टू जी धर्तीवर कसे राबविले जातील याबाबत चर्चा सुरु आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा लवकरच इस्त्राईलच्या पंतप्रधानांना भेटणार असून त्यामुळे भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ आणि मैत्रीपूर्ण होण्यास मदत होणार असल्याचेही डॅनिअल कार्मन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*