Unitech seeks stay of NCLT order…

  New Delhi: Real estate…

Airtel launches 4G in Kargil, Le…

  New Delhi: Bharti Airt…

Congress confident of forming go…

  Ahmedabad: Congress le…

Modi takes seaplane on last day …

  Ahmedabad: Prime Minis…

Higher fiscal deficit due to Bud…

  New Delhi: Government'…

Government prioritising homoeopa…

  Kolkata: Union Ministe…

Bengaluru metro rail to connect …

  Bengaluru: Bengaluru m…

Bollywood, sports stars wish Vir…

  Mumbai: From megastar …

Modi, Rahul's road shows in Ahme…

  Ahmedabad: Scheduled r…

Manali gets season's first snowf…

  Shimla: Snowfall conti…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

हिंदी निम्नस्तर आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई दि. 5 :महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे दि. 30 डिसेंबर 2017 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

मुंबई व कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी क्र.022-27573542 येथे पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज  विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी क्र. 020-26121709 येथे करता येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र. 0240-2361372 येथे अर्ज करता येतील.

हिंदी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 022- 26552184 वर संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*