Sharad Yadav faction to approach…

  Patna: The Janata Dal-…

Rainy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a ra…

'Good decision' on AIADMK merger…

  Chennai: Talks on the …

Nitish Kumar-led JD-U faction jo…

  Patna: The JD-U factio…

Will Modi opt for early general …

  The synchronisation of…

Steel consumption up 3.7% in Jul…

  Kolkata: India's steel…

People won't allow Rahul Gandhi …

  Lucknow: Hours before …

Huge opportunity in sustainable …

  New Delhi: Niti Aayog …

Bihar CM recommends CBI probe in…

  Patna: Bihar Chief Min…

Could not work amid unrelenting …

  Bengaluru: Announcing …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

गुणवत्तापूर्ण शिक्षक प्राप्त व्हावे यासाठी टी.ई.टी. पात्रता परीक्षा- शालेय व उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई, दि. 4 : राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता वाढावी यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टी. ई. टी.) अनिवार्य केली असल्याची माहिती विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील शिक्षक भरतीसाठी टीईटी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यास उपप्रश्न सदस्य चंद्रदीप नरके यांनी विचारला होता.

श्री तावडे म्हणाले, डी. एड. आणि बी. एड. ही शैक्षणिक योग्यता असून, टी. ई. टी. ही पात्रता परीक्षा आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे ही परीक्षा लागू केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून, गुणवत्तापुर्ण शिक्षक या प्रक्रियेत यावे हा उद्देश असून, गुणवत्तापूर्ण शिक्षक प्राप्त होत आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधे अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षण सेवक भरती करण्याबाबत शासन निर्णय पारित केला होता. सदर परीक्षा शासन निर्णयात प्रस्तावित केल्यानुसार सहा महिन्याच्या आत घेण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही श्री. तावडे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*