Rs 80,000 cr has come to BJP cof…

  Guwahati: Attacking th…

Cold wave freezes J&K; Gulma…

  Srinagar: Minimum temp…

Foggy Friday morning in Delhi, 1…

  New Delhi: It was a fo…

SC extends deadline for Aadhaar …

  New Delhi: The Supreme…

We will rake up fishermen issues…

  Kanyakumari (Tamil Nad…

Amarnath shrine not a silent zon…

  New Delhi: The Nationa…

Chidambaram accuses EC of 'sleep…

  New Delhi:Congress lea…

Election Commission has become M…

  New Delhi: The Congres…

We need virtue of frugality for …

  New Delhi: India needs…

Railways forms committee to revi…

  New Delhi: Over two mo…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

घाटकोपर स्टेशन रोड चौकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह नामकरण  

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

मुंबई,‍ दि. 29 : मराठी संस्कृतीशी एकरूप होऊन उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे. त्यामध्ये आय. डी. सिंह यांच्या सारख्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहेअसे गौरवोद्गार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. घाटकोपर येथील स्टेशन रोडवरील चौकाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह असे नामकरण करण्यात आले यानिमित्ताने आयोजित  कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते.

हिंदी हायस्कुलच्या बैजनाथ साबू सभागृहात आयोजित कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार राम कदम, आमदार नसीम खान, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, हिंदी विद्या प्रचार सभेचे कार्याध्यक्ष बेनीप्रसाद सिंघी, मानद सचिव डॉ. राजेंद्रसिंह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आय.डी. सिंह यांचे जीवन शिस्तबद्ध असे होते. त्यांनी हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज हिंदी विद्या प्रचार सभेच्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात आपल्या कार्याने भरच घातली आहे. भाषा हे संवादाचे माध्यम असते. मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिकांच्या संस्कृतीचे उत्तम अभिसरण झाल्याचे आढळते. सण उत्सव या माध्यमातून त्यामध्ये वैविध्यपूर्ण भर पडल्याचे दिसते. त्यामुळे चार पिढ्यांहून अधिक काळ येथे वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयांची पिढी आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री. फडणवीस यांनी हिंदी भाषेसाठी अमुल्य योगदान देणाऱ्या राम मनोहर त्रिपाठी यांच्या कार्याचाही गौरवाने उल्लेख केला. हिंदी विद्या प्रचार सभेच्या संस्थांनी राष्ट्राला पुढे नेणाऱ्या मानव संसाधनाच्या विकासात शिक्षणाच्या माध्यमातून असेच योगदान देत रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुरुवातीला संस्थेचे मानद सचिव डॉ. राजेंद्रसिंह यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सभागृहातूनच रिमोटद्वारे चौकाच्या नामकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच आय.डी. सिंह यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*