Woman breaches security cordon, …

  Kolkata: A woman bypas…

Allahabad HC refuses plea agains…

  Lucknow: In a big reli…

Reveal list of those whose NPAs …

  Thrissur (Kerala): The…

Mobile app e-saathi launched at …

  Lucknow: On the second…

PNB fraud: ED seizes luxury cars…

  New Delhi/Mumbai: The …

Opposition parties should field …

  New Delhi: Opposition …

'Canadian PM, politicians must n…

  Toronto: Reacting to P…

PNB fraud favouring Nirav Modi s…

  New Delhi: The practic…

Parrikar arrives in Goa, might t…

  Panaji: Goa Chief Mini…

Gunfight erupts in J&K

  Srinagar: A gunfight e…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

महिला सक्षमीकरणात गोदरेज कंपनीचा सहभाग महत्वाचा ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 12 : गोदरेज कंपनी खासगी उद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. गोदरेज कंपनी आता कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) यांच्याबरोबर एकत्र येऊन महिला सक्षमीकरणात महत्वाचा सहभाग नोंदवेल, असेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

cm12

राज्य शासनाचा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, गोदरेज अँड बॉयस आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्यात सांमजस्य करार (युएनडीपी) आज झाला.यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास व उद्योजकता आयुक्त ई. रवींद्रन, गोदरेज कंपनीचे फिरोजा गोदरेज, न्यारिका होळकर, अनुप मॅथ्यू, सीमा तिवारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ नंतर खासगी उद्योग कंपन्या राज्य शासनाबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत. गोदरेज या कंपनीने स्वत:चे असे वेगळे नाव निर्माण केले आहे. आता राज्य शासनाबरोबर करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारानुसार महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. आज करण्यात आलेला करार हा  सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) चा भाग असून या करारावर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर करार हा एक वर्षासाठी असून या करारानुसार 2000महिलांचे  उद्योग व्यवसायासाठी सक्षमीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. पाटील-निलंगेकर म्हणाले, कौशल्य विकास विभागामार्फत आज करण्यात आलेला‘मेक इन इंडिया’ नंतरचा 62 वा सामंजस्य करार आहे. खासगी उद्योग कंपन्या आज राज्य शासनाबरोबर वेगवेगळे सामंजस्य करार करण्यास उत्सुक आहेत ही आनंदाची बाब आहे. महामैत्री ऑनलाइन सिंगल विंडो सिस्टीम यामुळे खासगी उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यास मदत होत आहे.

मॅनग्रोव्हन ॲपचे उद्‌घाटन

या सामंजस्य कराराबरोबरच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मॅनग्रोव्हन ॲपचा शुभारंभ झाला. या ॲपमध्ये खारफुटीचे संरक्षण संवर्धन कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली आहे. आज जैव तंत्रज्ञान याचे वाढते महत्व लक्षात घेता आजच्या तरुण पिढीला हे ॲप नक्कीच आवडेल असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज झालेल्या सामंजस्य करारानुसार

  • गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमिटेड युएनडीपी आणि कौशल्य विकास विभागाबरोबर राज्यातील महिलांना सक्षम करण्याचे काम करेल.
  • सदर करार आजपासून कार्यान्वित झाला असून यामध्ये विविध उद्योग संस्था, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांचाही समावेश असेल.
  • महिलांना करीअर कौन्सिलिंग, कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेट्स , स्वयंरोजगार यासाठी सदर करार उपयोगी ठरणार आहे.
  • फर्निचर अँड फिटींग या क्षेत्रातही नवीन संधी असून यासाठी या करारामध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • 12जुलै 2017 ते 11 जुलै 2018 या काळात हा करार असून आवश्यकता वाटल्यास या कराराची मुदत वाढवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*