Water sports may expose you to a…

London:  Love to play wat…

Celebs take digital route to sta…

New Delhi: Film celebriti…

Face recognition to enhance Aadh…

New Delhi:The Unique Iden…

Chief Justice meets all judges i…

New Delhi: All the judges…

India, Israel to enhance agricul…

New Delhi: India and Isra…

UN vote set aside, stage set for…

  New Delhi: With Israel…

Two arrested for dumping potatoe…

  Lucknow: Two Samajwadi…

No anti-incumbency in Karnataka,…

  New Delhi: After meeti…

Pawan Hans chopper missing off M…

  Mumbai: A Pawan Hans h…

'Re-open case against Amit Shah …

  Panaji: The criminal c…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

चौरस आहारगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई,दि.31 : मंत्रालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या चौरस आहारगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ऐतिहासिक असे हे चौरस आहारगृह 1945  पासुन सुरु करण्यात आले आहे. काळानुसार ते बदलत गेले. नुतनीकरण करण्यात आलेले  आहारगृह अतिशय सुंदर व सर्व सोयीनीयुक्त आहे. याठिकाणी 1500 ते 1600 लोकांची जेवणाची सोय होते. या आहारगृहात आपण आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

Hon. CM at Chauras Aahargruh Inaugaration-3

हे चौरस आहारगृह 8 ऑगस्ट 1945 पासून नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखाली सुरु करण्यात आले होते. 1967 मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्थायी कल्याणकारी योजना म्हणून चौरस आहारगृह ना नफा ना तोटा तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला. या आहार गृहात 20 ते 25 मिनीटात 200 व्यक्तींना जेवण पुरविण्याची व्यवस्था असल्याचे प्रास्ताविक करताना सहसचिव (उपाहारगृहे) इम्तियाज काझी यांनी सांगितले.

याप्रसंगी महाव्यवस्थापक (उपाहारगृहे) दादासाहेब खताळ, प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे, वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र जाधव तसेच मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*