Water sports may expose you to a…

London:  Love to play wat…

Celebs take digital route to sta…

New Delhi: Film celebriti…

Face recognition to enhance Aadh…

New Delhi:The Unique Iden…

Chief Justice meets all judges i…

New Delhi: All the judges…

India, Israel to enhance agricul…

New Delhi: India and Isra…

UN vote set aside, stage set for…

  New Delhi: With Israel…

Two arrested for dumping potatoe…

  Lucknow: Two Samajwadi…

No anti-incumbency in Karnataka,…

  New Delhi: After meeti…

Pawan Hans chopper missing off M…

  Mumbai: A Pawan Hans h…

'Re-open case against Amit Shah …

  Panaji: The criminal c…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करू कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

नागपूर, दि. 15 : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी मदत जाहीर करण्यात येईल, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे – पाटील, आमदार विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, अमर काळे, अस्लम शेख, ॲड. यशोमती ठाकूर आदींनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास उत्तर देताना मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.

मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, राज्यातील 5 लाख 2 हजार 212 इतक्या शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागास कळविले आहे. याशिवाय महसूल विभागामार्फत बोंडअळीग्रस्त कापूस क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत. हे पंचनामे पूर्ण झाले की बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांकडून, विम्याद्वारे तसेच एनडीआरएफमार्फत मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्यात 42.06 लाख हेक्टरवर यंदा कापूस लागवड झाली असून त्यापैकी 98 टक्के क्षेत्र हे बीजी – 2 या बीटी कापूस पिकाखालील आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*