Rahul Gandhi's hands full of cha…

  New Delhi: Anticipated…

Land most sought asset of Salem …

  Chennai: Tamil Nadu Ch…

Tripura CM urges Bangladesh to o…

  Chottakhola (Tripura):…

Policeman trains gun at Kamal Na…

  Chhindwara (Madhya Pra…

SC imposes Rs 1 lakh cost on NGO…

  New Delhi: The Supreme…

Modi to visit Ockhi-hit fishing …

  Thiruvananthapuram: Af…

Rahul's impending takeover spark…

  New Delhi: Scores of R…

President offers prayers at Sang…

  Lucknow: On the second…

Recognise Jerusalem as Palestine…

  Hyderabad: MIM chief A…

Three years jail for Jharkhand e…

  New Delhi: A court her…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

बाल व महिला कॅन्सर रूग्‍णालयासाठी विशेष अधिकारी नियुक्त करणार

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

– चंद्रकांत पाटील

 

मुंबई, दि.27:परळ येथील हाफकीन संस्थेची जागा टाटा मेमोरीयल सेंटरच्या बाल व महिला कॅन्सर रूग्‍णालय आणि रेडीओ थेरपी सेंटरसाठी देण्यात आली आहे. हा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प सुरू करण्यासाठीची मुदत वाढविण्यात येणार आहे. या सेंटर उभारणीसाठीची कामे तातडीने सुरू व्हावीत यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात परळ मुंबई येथील हाफकीन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरला दिल्याबाबत सदस्य दत्तात्रय भरणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी उपप्रश्नांना उत्तर देताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले, रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने ही जागा टाटा सेंटरला दिली असून, लवकरच हे सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासकीय / निमशासकीय सेवेतील कर्करोग पीडित कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात उपचारासाठी ५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहे.

तसेच, टाटा मेमोरिअल सेंटरला देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या हाफकीन संस्थेच्या जागेमध्ये संस्थेतील अधिका-यांची निवासस्थाने, विद्यार्थ्यांच्या खोल्या, अतिथीगृहे व वर्ग ४ च्या कर्मचा-यांसाठी निवासस्थाने येत असल्याने पर्यायी इमारती बांधण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर ५ कोटी रूपये देणार असल्याची माहितीही श्री राठोड यांनी विधानसभेत दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे पाटीलन, मंगलप्रभात लोढा, अजय चौधरी, राज पुरोहीत यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*