Delhi CS 'assault': AAP cries fo…

  New Delhi: Delhi Polic…

Rs 60,000 cr affordable housing …

  New Delhi: Admitting t…

Sushma calls on Canadian PM

  New Delhi: External Af…

Will put across inputs by IAS as…

  New Delhi: Minister of…

PNB fraud: ED freezes Nirav's ba…

  New Delhi/Mumbai: The …

Modi receives Canadian PM ahead …

  New Delhi: Prime Minis…

NPP releases 'People's Document'…

  Jowai (Meghalaya): Nat…

'Assault' on Delhi CS: Police "r…

  New Delhi: Delhi Polic…

Misty Friday morning in Delhi

  New Delhi: It was a mi…

Modi runs 90% commission governm…

  Bengaluru: Karnataka C…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

ऐरोली येथे वृक्षारोपणाच्या राज्यस्तरीय महामोहिमेचा शुभारंभ

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

ठाणे दि १: जल, जंगल आणि जमीन या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या तीनही बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पावले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सदगुरु जग्गी वासुदेवजी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम आदींची उपस्थिती होती.

AIROLI

ऐरोली सेक्टर १० येथे कोस्टल एंड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण या राज्य पुष्पाचे रोपटे, तर नितीन गडकरी व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपळ, तर सुधीर मुनगंटीवार आणि सद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्या हस्ते कडुलिंबाचे रोपटे लावण्यात आले. यावेळी मुसळधार पाऊस सुरु असतांना देखील उपस्थित मान्यवर, विद्यार्थी,नागरिक यांचा रोपे लावण्याचा उत्साह कमी झाला नव्हता.

नदी बचाव मोहिमेतही सहभागी होणार

जग्गी वासुदेवजी यांनी नदी बचाव मोहिमेची देशव्यापी सुरुवात केली असून महाराष्ट्र देखील या मोहिमेत आघाडीवर असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, सुधीरभाऊंनी झाडे लावण्याचा जो निर्धार केला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील वनांचे आच्छादन ३३ टक्के झाल्याशिवाय राहणार नाही. मागील वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतांना अडीच कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. वनविभागाने कात टाकली असून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. खड्डे खोदण्यापासून ते रोपे लावणे आणि ते जगविणे या सर्वांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येते. प्रत्येक रोपांचे जिओ टॅगिंग केले जात आहे.

जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्त्रोत जिवंत करण्याचे काम सुरु आहे तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत जमिनीचा कस कसा वाढेल आणि ती सुपीक कशी होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अनुकरण देशभर व्हावे

याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वन विभागाच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अतिशय कमी कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने हाती घेतलेल्या या मोहिमेचे अनुकरण इतर राज्यांनी देखील करावे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे नियोजन केले आहे.

आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर आम्ही भर देणार असून नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणाऱ्या ५५ बसेस सुरु केल्या आहेत. देशात अगरबत्तीच्या व्यवसायासाठी ४० हजार कोटींचे लाकूड आयात होत असून ४ हजार कोटींच्या काड्या आयात होतात, पण आता गडचिरोली येथे सुधीरभाऊंनी अगरबत्ती उत्पादनासाठी तेथीलच जंगलातील बांबू व इतर लाकूड याचा उपयोग करुन क्लस्टर सुरु केले आहे. त्याचा निश्चितच फायदा स्थानिक उद्योगाला होईल. बांबूचा देखील चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो असे ते म्हणाले.

जग्गी वासुदेवजी यांनी देखील या मोहिमेची प्रशंसा करून आपल्या नदी बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

राज्य ३३ टक्के हरित करणारच

प्रारंभी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रास्ताविकात पुढील तीन वर्षांत वन विभागाच्या माध्यमातून ५० कोटी झाडे कोणत्याही परिस्थितीत लावणार असे सांगून या चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त रोपे लावणार असा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले की, सध्या राज्यात २० टक्यांपेक्षा देखील कमी हरित क्षेत्र आहे. पण या मोहिमेनंतर हे हरित क्षेत्र वाढून ३३ टक्के होणारच. ऐरोली येथील हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दृष्टिहीन शाळकरी मुलांनी उत्साहात रोपे लावली त्याचा उल्लेखही त्यांनी केला. १६ कोटी ६० लाख रोपटी आता नर्सरीत तयार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जग्गी वासुदेवजी यांच्या ईशा फाऊन्डेशन समवेत वृक्षारोपणाचा करार करण्यात आला. विश्वस्त कृष्णा अरुप,सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या.

संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्रदान

याप्रसंगी सावनेर तालुक्यातील सोनापूर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला १० लाख रुपयांचा संत तुकाराम वनग्राम प्रथम पुरस्कार देण्यात आला तर ५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला आणि भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हिंगोलीतील आंगणवाडा संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आले.

माहितीपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन

याप्रसंगी ‘महाराष्ट्रातील सागरी जैवविविधता –एक परिचय’ हे आयझेक किहीमकर व सुप्रिया झुनझुनवाला लिखीत पुस्तक, ‘कोल्हापूर वनवृत्तातील रेस्क्यू ऑपरेशन’ तसेच अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी लिहिलेल्या ‘हिस्ट्री ऑफ मॅन्ग्रोव्हज’ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

बायकर्स रॅली

यावेळी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते बायकर्स रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. २२ बायकर्स हे वृक्षारोपणाचा संदेश देत राज्यातील जिल्ह्यांतून फिरणार असून ७ तारखेस ठाणे येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

आजच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, गणपत गायकवाड, मुख्य सचिव सुमित मल्लिक, महापौर सुधाकर सोनवणे, श्रीमती सपना मुनगंटीवार आदींची उपस्थिती होती.

वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी यावेळी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*