'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

Modi, Iran President discuss bil…

  New Delhi: Prime Minis…

Itel Mobile registers 217% growt…

  New Delhi: With a 9 pe…

Restrictions in Srinagar to prev…

  Srinagar: Authorities …

Foggy Saturday morning in Delhi

  New Delhi: It was a fo…

Karnataka to provide healthcare …

  Bengaluru: In line wit…

Dalit activist who set himself o…

  Ahmedabad: A 60-year-o…

NDPP-BJP will storm power in Nag…

  Kohima: Nationalist De…

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

अर्ज करण्यासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई, दि. 5 :  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी आता 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार असून सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या सर्व ॲटॅचमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 14 डिसेंबर 2017 पूर्वी सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

सन 2014-15, 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 14 डिसेंबर 2017 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तसेच सदर अर्जाची प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल, सायन-बांद्रा रोड, धारावी बस डेपोशेजारी, सायन (पश्चिम), मुंबई- 17 येथे सादर करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*