India best placed to leverage te…

  Hyderabad: Prime Minis…

Hardik may campaign for MP polls

  Bhopal: Gujarat's Pati…

Journalist who wrote about Parri…

  Panaji: A journalist w…

NCP candidate among 4 killed in …

  Shillong: Four people,…

Clear sky in J&K cause sub-z…

  Jammu/Srinagar: A clea…

Partly cloudy sky on Monday

  New Delhi:It was a par…

Canadian PM visits Mathura wildl…

  Lucknow: Canadian Prim…

'Journalism was like instant cof…

  New Delhi: She worked …

PNB fraud: Ex-Deputy Bank Manage…

  New Delhi:The Central …

Arvinder Singh Lovely returns to…

  New Delhi: In a boost …

«
»
TwitterFacebookPinterestGoogle+

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावणार राज्यमंत्री विजय देशमुख

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

 

मुंबई,दि ०७:राज्यातील जिल्हा परिषद आरोग्यकर्मचाऱ्यांच्यापदोन्नती,पदपुनरुज्जीवन व इतर समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील.त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाईल असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज सांगितले.

भारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्यकर्मचाऱ्यांच्या विविधसमस्यांबाबत मंत्रालयात श्री. देशमुख यांचीआज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीतभारतीय जनता कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद आरोग्यकर्मचाऱ्यांच्या विविधसमस्यांबाबत निवेदने श्री.देशमुख यांना दिली.  यावेळी श्री देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेतील आरोग्य सहाय्यकांना लवकरच त्यांच्यासेवा जेष्ठते नुसार पदोन्नती देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.याबरोबरच रिक्त पदे भरण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जाईल.त्यासाठी जिल्हा परिषदांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मागवण्यात आला असून रिक्त पदे भरल्यानंतर त्यांचे वेतन नियमित होण्यासाठी तरतूद केली जाईल.आरोग्य पर्यवेक्षकांनाआवश्यक सोयी सुविधा पुराविण्यातयेतील.

राज्यभरात६ हजारांवर बंधपत्रिका कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. नव्याने परीक्षा घेऊनपदे भरण्यापेक्षा या आरोग्य सेविकांची एकत्रित सेवा जेष्ठता यादी तयार करून निवड समिती नेमून पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.या बरोबरच राज्य जिल्हा पातळीवर आदर्श आरोग्य कर्मचारी दिले जातील.राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्न शील आहे.आरोग्य सहाय्यक या पदाची ६ व्या वेतन आयोगामध्ये प्रलंबित राहिलेली वेतनत्रुटीदुरुस्त करण्याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन या वेळी श्री देशमुख यांनी शिष्टमंडळालादिले.

यावेळी आरोग्य विभागाचे (हिवताप) सहसंचालकएम.एस. डिग्गीकर, ग्राम विकास विभागाचे उपसचिव गिरीशभालेराव, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर, भारतीय जनता कामगार महासंघाचे अध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CAPTCHA Image

*